शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या शाळेत नव्या प्रवेशांची नोंदच नाही

By admin | Updated: November 24, 2015 01:02 IST

शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सहा महिने उलटून गेले तरी, नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची बहुतांश शाळांनी नोंदवहीत नावेच लिहिली नसल्याचे शिक्षण विभागाच्या पाहणीतच उघडकीस आले आहे

पुणे : शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सहा महिने उलटून गेले तरी, नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची बहुतांश शाळांनी नोंदवहीत नावेच लिहिली नसल्याचे शिक्षण विभागाच्या पाहणीतच उघडकीस आले आहे. त्यामुळे अद्यापही या नव्या प्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रवेश अधिकृत झाले नसल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही शाळेमध्ये जर एखादा विद्यार्थी नव्याने प्रवेशित झाला, तर शाळेकडून त्यांची नोंदवहीत नाव घालून त्याला अधिकृत नोंदणी क्रमांक देण्याची पद्धत आहे. विद्यार्थ्याचा प्रवेश झाल्यापासून १ ते २ दिवसांत होणे अपेक्षित आहे. तसा नियमही आहे. या नोंदवहीत जर विद्यार्थ्याचे नाव नोंदविले तरच त्याचा प्रवेश झाला, असे ग्राह्य धरण्यात येते. मात्र, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडूनच करण्यात आलेल्या पाहणीत हे सत्य उघड झाले आहे. बहुतांशी शाळांनी नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांची नोंद सहा महिने उलटून गेले तरीही केलेली नाही. मुख्य म्हणजे हा सर्व प्रकार होऊनही पालिका अधिकाऱ्यांकडून अद्यापपर्यंत याबाबत कोणत्याही मुख्याध्यापक किंवा शिक्षकावर कारवाई झालेली नाही. याबाबत शिक्षण मंडळातील सूत्रांनी सांगितले की, बरेच विद्यार्थी हे मधूनच शाळा सोडून जातात. गळती होते. नोंद झाल्यानंतर जर काही विद्यार्थी शाळा सोडून गेले तर त्यानंतर शिक्षकांना अनेक प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. त्यामुळे बहुतांशी शिक्षक हे नव्याने प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांची अर्धे वर्ष होईपर्यंत नोंदच करत नाहीत. नवीन विद्यार्थी प्रवेशित झाल्यानंतर जुलैमध्येच शिक्षण मंडळाने नोंद करणे आवश्यक आहे. त्यानंतर पर्यवेक्षकांकडून या नोंदी झाल्या आहेत की नाही याची तपासणीही करण्यात येते. यासंदर्भात पुन्हा एकदा सूचना देण्यात येतील व जे मुख्याध्यापक व शिक्षक या नोंदी करणार नाहीत, त्यांच्यावर तसेच संबंधित पर्यवेक्षकावरही कारवाई करण्यात येईल. - बबन दहिफळे, शिक्षणप्रमुख, पुणे महापालिका शिक्षण मंडळ