शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकेल यात शंका नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बारामती : ‘सरकार चालवताना काही प्रश्न जरूर निर्माण होतात. महाविकास आघाडीची निर्मिती होतानाच असे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बारामती : ‘सरकार चालवताना काही प्रश्न जरूर निर्माण होतात. महाविकास आघाडीची निर्मिती होतानाच असे प्रश्न सोडविण्यासाठी एक यंत्रणा असावी, असा निर्णय झाला होता. त्याची जबाबदारी देखील तिन्ही पक्षांच्या काही सहकाऱ्यांकडे सोपवली आहे. कोणत्याही महत्त्वाच्या धोरणात्मक प्रश्नासाठी हे सहकारी एकत्र बसतात आणि त्यावर निर्णय घेत असतात. त्यामुळं हे सरकार अत्यंत व्यवस्थित चाललं आहे. हे सरकार पाच वर्षे टिकेल याबद्दल शंका नाही,’ असे ठाम मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

बारामती येथील ‘गोविंदबाग’ या निवासस्थानी रविवारी (दि. २७) पवार माध्यामांशी बोलत होते. मागील काही दिवसांपासून पदोन्नती आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये कुरबुरी वाढल्या होत्या. त्यातच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळे भाजप-शिवसेना युतीची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर शरद पवार माध्यमांशी बोलत होते. पवार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना आम्ही काही मुद्यांवर एकत्र आलो. त्या वेळी किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आला होता. सरकार चालवत असताना काही ना काही प्रश्न निर्माण होतात. या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी एक यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे. यात काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई, तर राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि जयंत पाटील हे समन्वय साधण्याचं काम करतात. सरकारमध्ये काही अडचण आल्यास धोरणात्मक निर्णय हे सहा जण घेत असतात. त्यामुळे हे सरकार पाच वर्षं चालेल, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही, असे पवार म्हणाले.

---------------------

प्रत्येकाला संघटनात्मक ताकद वाढवण्याचा

अधिकार, आमच्यात मतभेद नाहीत...

राजकारणात प्रत्येक पक्ष आपापली संघटनात्मक ताकद वाढवत असतो. यामध्ये काही गैर नाही. शिवसेना असो, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी असो सर्व पक्षांना संघटना वाढवण्याचा पूर्ण अधिकार असून, याबद्दल आमच्यात सामंजस्य असून कुठेही मतभेद नाही, असेही या वेळी पवार म्हणाले.

----------------------------

आरबीआयचा निर्णय स्वीकारावा लागेल...

नुकतेच रिझर्व्ह बँकेने आमदार, खासदार आणि मंत्र्यांना आता सहकारी बँकेच्या निवडीवर निर्बंध आणले आहेत या मुद्द्यावर बोलताना. पवार यांनी ‘भारतीय रिझर्व्ह बँक ही अर्थविषयक संस्थांवर नियंत्रण ठेवणारी संस्था आहे. त्यामुळे त्यांनी काही धोरणात्मक निर्णय घेतला असेल, तर त्याची माहिती घ्यावी लागेल. मात्र, त्यांचा असेल तो निर्णय स्वीकारावा लागेल.’ अशा शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली.

-----------------------------