शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’च्या स्वच्छतागृहांबाबत महिलांमध्ये प्रबोधनच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 03:26 IST

शहरात मध्यवस्ती, गर्दीच्या ठिकाणी स्वयंचलित पंखे, लाईट फ्लश, कपडे अडकवण्याचे हँगर, वेंडिंग मशीन, सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी आधुनिक मशीन अशी सर्व सोयी-सुविधायुक्त ‘ती’ स्वच्छतागृह, ई-टॉयलेटमुळे महिलांची चांगली सोय झाली आहे.

पुणे : शहरात मध्यवस्ती, गर्दीच्या ठिकाणी स्वयंचलित पंखे, लाईट फ्लश, कपडे अडकवण्याचे हँगर, वेंडिंग मशीन, सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी आधुनिक मशीन अशी सर्व सोयी-सुविधायुक्त ‘ती’ स्वच्छतागृह, ई-टॉयलेटमुळे महिलांची चांगली सोय झाली आहे. परंतु ई-टॉयलेट स्वच्छ व सोयीच्या ठिकाणी असली तरी त्यांच्या वापराबाबत महिलांना फारशी माहिती नसल्याने व वापरताना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. यामुळे हे ई टॉयलेट वापराबाबत प्रबोधन करण्याची गरज असल्याचे निदर्शनास आले.शहरात ठिकठिकाणी महिलांसाठी ई टॉयलेट्स तसेच ‘ती’ स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यात आली आहेत. फर्ग्युसन कॉलेज रस्ता, जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर, सारसबाग अशा काही मध्यवर्ती ठिकाणी ही सोय करण्यात आली आहे. स्वच्छतागृह वापरासाठी साधारण पाच रुपये शुल्क आकारले जाते. या स्वच्छतागृहांमध्ये स्वयंचलित पंखे, लाईट, फ्लश, कपडे अडकवण्याचे हँगर, वेंडिंग मशीन, सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी मशीन अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. स्वच्छतागृहाबद्दल काही तक्रार असल्यास तिथे दिलेल्या क्रमांकावर संपर्क केल्यास तक्रार निवारणासाठी त्वरित काम केले जाते.परंतु ही स्वच्छतागृहे वापरण्यासाठी महिला फारशा उत्सुक दिसत नाहीत. याची कारणे म्हणजे त्यांचा वापर करणे फारसे सोपे जात नाही. स्वच्छतागृहांवर वापरासंबंधी असलेल्या सूचना समजून त्याचा वापर करणे काही प्रमाणात अवघड जात आहे. तसेच काही तांत्रिक समस्यांचाही सामना करावा लागत आहे. काही टॉयलेट्सही त्यात पैसे टाकल्यावरच उघडतात. परंतु काही ठिकाणी असे दिसून आले, की पैसे टाकले तरीही काही वेळेस ती उघडत नाहीत किंवा काही वेळेला पैसे परत येतात. काही ठिकाणची स्वच्छतागृहे बंद अवस्थेत आढळली. या प्रकारच्या टॉयलेट्सबद्दल महिलांच्या मनात ती अस्वच्छ असतील, असा गैरसमज आहे, त्यामुळे काही जणी यांचा वापर करणे टाळत असल्याचे पाहणीमध्ये निदर्शनास आले. उपक्रम चांगला आहे परंतु या टॉयलेट्सच्या वापराबद्दल जागृती करण्यात यावी, तसेच यांची संख्याही वाढवण्याची गरज आहे.आरोग्यदायक स्वच्छतागृहे उपलब्ध करून देणारसध्या शहरात महिलांसाठी आवश्यक तेवढी स्वच्छतागृहे उपलब्ध नाहीत. परंतु महिलांसाठी स्वच्छ व आरोग्यदायक स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यासाठी ‘ई-टॉयलेट,’ ‘ती’ स्वच्छतागृह संकल्पना समोर आणली आहे. शहराच्या काही प्रमुख ठिकाणी ही स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. भविष्यात जास्तीत जास्त ठिकाणी या स्वरुपाची स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न आहे.- राजश्री नवले, अध्यक्षा, महिला व बालकल्याण समिती

टॅग्स :Womenमहिला