शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

मोशी डेपोमध्ये पडतेय कचऱ्याची भर

By admin | Updated: December 18, 2014 04:38 IST

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील जैववैद्यकीय कचरा विल्हेवाट प्रकल्पाची (बायोमेडिकल वेस्ट) इन्सिनरेटर यंत्र

पिंपरी: महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील जैववैद्यकीय कचरा विल्हेवाट प्रकल्पाची (बायोमेडिकल वेस्ट) इन्सिनरेटर यंत्रणा मोशीतील कचरा डेपोमध्ये हलविण्यात येणार आहे. त्याचबरोबर आता हॉटेल वेस्टच्या विल्हेवाटीची स्वतंत्र यंत्रणा मोशीतील कचरा डेपोत कार्यान्वित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. आतापर्यंत मोशीतील कचरा डेपो अन्यत्र स्थलांतरित होईल, अशी आशा बाळगलेले रहिवासी आणखी कचऱ्याच्या विळख्यात अडकणार आहेत. शहरात हॉटेल वेस्टचा सुमारे ५० टन कचरा रोज जमा होतो. घरगुती वापरातून बाहेर पडणारा कचरा ठिकठिकाणच्या कुंड्यांमध्ये जमा केला जातो. हॉटेल वेस्टसह रोज मोशीतील कचरा डेपोत एकाच वेळी सुमारे ६०० टन कचरा जमा होतो. त्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे कठीण होते. ते टाळण्यासाठी हॉटेल वेस्टची विल्हेवाट स्वतंत्ररीत्या लावण्यासाठी प्रकल्प उभारणीचा महापालिका अधिकाऱ्यांचा मनोदय आहे. ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित कराह्ण (बीओटी) तत्त्वावर बायोगॅस प्रकल्प सुरू केला जाणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक दिवशी ६०० टन ओला व सुका कचरा मोशी कचरा डेपोमध्ये टाकला जातो. या कचऱ्यापैकी सुमारे ५० टन कचरा हा हॉटेल वेस्ट आहे. हॉटेलमधून येणारा सगळा कचरा ओलाच असतो. मात्र, हा ५० टन कचरा मोशीतील कचरा डेपोमध्ये जातो. तेथे इतर कचऱ्यांमध्ये तो मिसळला जातो. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावताना अडचणी येतात. हॉटेल वेस्टची स्वतंत्ररीत्या विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणे आवश्यक वाटल्याने पर्यावरण विभागाने प्रस्ताव तयार केला आहे. हॉटेल वेस्टची स्वतंत्र विल्हेवाट लावण्यासाठीचा प्रस्ताव पर्यावरण विभागाकडून तयार करण्यात आला आहे. त्यानुसार महापालिकेला दोन ते तीन एकर जागा उपलब्ध करून द्यायची आहे. महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या जागेवर ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वावर बायोगॅस प्रकल्प चालविण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून मोशी कचरा डेपोजवळ जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचबरोबर अत्यंत घातक मानला जाणारा रुग्णालयीन कचरा (जैववैद्यकीय कचरा) नष्ट करणारी यंत्रणासुद्धा मोशीतील कचरा डेपोतच कार्यान्वित करण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेवेळी रुग्णांच्या शरीराचे, अवयवाचे कापलेले भाग, तसेच वापरात आलेल्या इंजेक्शन सुया, सिरिंज, टाकाऊ वस्तू अन्य कचऱ्याप्रमाणे नष्ट करता येत नाहीत. विशिष्ट प्रक्रिया करून अशा जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावावी लागते. (प्रतिनिधी)