शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

‘मार्च एंड’च्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर ‘घोळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:11 IST

पुणे : पालिकेकडून केल्या जाणाऱ्या विकासकामांचे ‘पोस्टमार्टेम’ सुरू केले आहे. विकासकामांची प्रत्यक्ष जागेवर पाहणी न करताच मोजमापे आणि दर्जा ...

पुणे : पालिकेकडून केल्या जाणाऱ्या विकासकामांचे ‘पोस्टमार्टेम’ सुरू केले आहे. विकासकामांची प्रत्यक्ष जागेवर पाहणी न करताच मोजमापे आणि दर्जा प्रमाणित केल्याचे समोर आले आहे. यासोबतच कामे अर्धवट सुरू असतानाही बिले सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पालिका आयुक्तांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून तब्बल १९ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामध्ये एक परिमंडळ उपायुक्त, दोन सहायक आयुक्त, तीन सहायक अभियंता आणि ११ कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश आहे. नोटीसीला समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कारवाई केली जाणार असल्याचे पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ४० टक्केच कामे केली आहेत. आर्थिक वर्षाच्या शेवटी मर्यादित कामांना परवानगी दिली. पालिका आयुक्तांनी वित्तीय समितीचे सर्व अधिकार स्वत:कडे घेतले होते. शेवटच्या टप्प्यात १९ मार्चपर्यंतच कामांचे कार्यादेश (वर्क ऑर्डर) आणि २५ मार्चपर्यंत बिले सादर करण्याची मुदत दिली होती. या कामांमध्ये होणारा ‘झोल’ लक्षात घेता यंदा कामांच्या दर्जाची तपासणी करण्यासाठी एक विशेष दक्षता पथकही नेमले आहे.

या दक्षता पथकाने २३ कामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. कागदपत्रेही तपासली. यावेळी अनेक कामांमध्ये गोंधळ असल्याचे लक्षात आले. कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून अशास्त्रीय कामे झाल्याचे समोर आले. या कामांचा पहिला अहवाल २२ मार्चला तर दुसरा अहवाल ३१ मार्चला आयुक्तांना सादर केला होता.

--

‘थर्ड पार्टी ऑडीट’च्या कामांची गुणवत्ता राखण्यासाठी करावी लागणारी मालाची तपासणी व अन्य बाबींवर थर्ड पार्टी ऑडीटरने लक्ष देणे अपेक्षित आहे. मात्र, कोणत्या विकास कामांसाठी कोणता ऑडीटर नेमला आहे, याची माहितीच कनिष्ठ अभियंत्यांपासून उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनाही नसल्याचे निदर्शनास आले. तपासणीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून शहरातील आणखी कामांची तपासणी केली जाणार असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

--

१. रस्त्यांच्या कामाचे नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी घेण्यात आले नाहीत.

२. कामासाठी वापरलेला माल प्रमाणीत असल्याबाबतचेही अहवाल जोडलेेले नाहीत.

३. एका ठिकाणी ड्रेनेज लाईनचा प्रवाहच उताराच्या विरूद्ध दिशेने नेला आहे. ड्रेनेजचे पाणी चेंबरमधून घरांमध्ये शिरेल, अशा पद्धतीने काम झाले आहे.

४. कामे पूर्ण झालेली नसताना बिलांसाठी फाईल सादर करण्यात आल्या.