शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो स्टेशनसाठी येताहेत अडथळेच

By admin | Updated: May 23, 2017 05:35 IST

मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हा मार्ग प्रस्तावित असून, या मार्गाचे काम लवकरच सुरूहोणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हा मार्ग प्रस्तावित असून, या मार्गाचे काम लवकरच सुरूहोणार आहे. या मार्गावर विविध ठिकाणी स्टेशन उभारण्यात येणार आहे. मेट्रो स्टेशनसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी महामेट्रोच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव दिला आहे. परंतु कृषी महाविद्यालयाची जागा मेट्रो डेपोसाठी देण्यास जाहीर विरोध करण्यात आला आहे. याचप्रमाणे अन्य खासगी जागामालकांनीदेखील मेट्रोला जागा देण्यासाठी विरोध केला आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन कंपनीच्या वतीने पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हा मेट्रो मार्गाचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. हा मेट्रोमार्ग १६.५८ किलोमीटरचा असून, यात ११.५७ किलोमीटर रस्त्यावरील मार्ग (एलिव्हेटेड) आहे तर सुमारे सव्वापाच किलोमीटर मेट्रो भुयारीमार्ग (अंडर ग्राऊंड) असणार आहे. या सोळा किलोमीटरच्या अंतरामध्ये एकूण १५ स्टेशन असून, ६ स्टेशन अंडरग्रांऊड असणार आहे. या मार्गाचा डीपोआर तयार झाला आहे. पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्सदरम्यानचे काम नुकतेच एनसीसी लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. तर मेट्रो स्टेशनच्या बांधकामासाठी स्वतंत्र निविदा काढण्यात आली आहे. या निविदेची मुदत १३ जूनपर्यंत आहे. काम करणारी कंपनी निश्चित झाल्यानंतर मेट्रो स्टेशनच्या कामाला गती येणार आहे. परंतु पहिल्या टप्प्यातील मार्गावर कृषी महाविद्यालयाच्या सुमारे ३० एकर जागेवर मेट्रो प्रकल्पाचा डेपो उभरण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी आवश्यक असलेली जागा संपादित करण्यासाठीची प्रक्रिया लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. परंतु ही जागा संपादित केल्यास कृषी शिक्षणाच्या मॉडेलचा धोका निर्माण होऊ शकतो, केंद्र शासनाच्या नियमानुसार कृषी महाविद्यालयासाठी १२० हेक्टर जमीन आवश्यक असताना सध्या महाविद्यालयाकडे केवळ ९० हेक्टर जमीन शिल्लक राहिली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कृषी महाविद्यालयाची जागा संपादित करण्यात येऊ नये अशी मागणी कृषी महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी केली आहे.पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हा मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. या मार्गावरील यासाठी शहराच्या विविध भागांतील आठ जागांचे प्रस्ताव महामेट्रोच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केले आहेत. यामध्ये बहुतेक जागा सरकारी मालकीच्या असून, यापैकी काही जागांवर शासकीय कार्यालये सुरु आहेत तर खाजगी मालकीच्या जागा मिळविण्यासाठी महामेट्रोच्या वतीने प्रयत्न सुरु आहेत. यापैकी काही जणांनी जागा देण्यास विरोध केला आहे.