शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विशेष बाल पोलीस पथकेच नाहीत

By admin | Updated: November 14, 2014 23:53 IST

एखाद्या लहानग्यास लैंगिक अत्याचाराने होरपळले असेल, तर त्याची चौकशी पोलिसी खाक्यात नव्हे, तर आपुलकीने व्हावी..

हिनाकौसर खान-पिंजार - पुणो
एखाद्या  लहानग्यास लैंगिक अत्याचाराने होरपळले असेल, तर  त्याची चौकशी पोलिसी खाक्यात नव्हे, तर आपुलकीने व्हावी.. त्याने कायदा मोडला वा त्याचा रस्ता भरटकला, तरी त्याच्याशी दोस्ती करून तपासणी व्हावी, गुन्हेगारी पद्धतीने नव्हे!!  गुन्हेगारी गर्तेत अडकलेली लहान मुले, तसेच अत्याचारग्रस्त मुलांचा प्रश्न संवेदनशील असल्याने तो तसाच हाताळावा म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशनला विशेष बाल पोलिसांचे पथक असावे, असा कायदा सांगतो; मात्र पुण्यातील कोणत्याही पोलीस स्टेशनवर असे पथक नाही.  लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना मोठय़ा प्रमाणात उजेडात येत आहेत; मात्र असे पथक प्रत्यक्षात नसल्याची धक्कादायक बाब आहे.
सध्या बहुतेक पोलीस स्टेशनवर विधिसंघर्षग्रस्त बालकांनाही मोठय़ा गुन्हेगारांप्रमाणोच वागणूक दिली जात असल्याचे वास्तव चित्र आहे. 
‘बचपन बचाओ आंदोलना’ने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या निकालानुसार, तसेच बालन्याय कायदा 2क्क्क्च्या निर्देशानुसार, प्रत्येक पोलीस स्टेशनवर पोलिसांनी विशेष बाल पोलीस पथक स्थापन करून, या पथकात लहान मुलांशी मैत्रीने वागणारे पोलीस नेमणो अनिवार्य आहे. मात्र, शहरात असे कोणतेही पथक नेमलेलेच नाही. काही वेळा बालकांसंदर्भात काम करणा:या स्वयंसेवी संस्थांना बालके  व संरक्षण  निगडित पोलीस स्टेशनवरील वरिष्ठ पोलीस निरीक्षकच काम पाहतो, अशी माहिती देऊन बोळवण केली जाते. 
लहान मुलांवरील अत्याचारासंदर्भात कायदा कडक झाल्याने असे प्रकार मोठय़ा प्रमाणात उजेडात येऊ लागले आहेत. अशा वेळी मुलांची पोलीस वर्दीत, तसेच चौकीवर चौकशी होऊ नये.  मात्र, प्रत्यक्षात असे पथकच नसल्याने पोलीस स्टेशनवरच मुलांना हजर राहून चौकशीला सामोरे जावे लागते. 
 
बालन्याय कायद्यानुसार विशेष बाल पोलीस पथक असा नियम बंधनकारक आहे; मात्र प्रत्यक्षात काम करताना आजतागायत पोलिसांकडे असे पथक असल्याचा अनुभव नाही आला. याबाबत विचारणा केल्यावर वरिष्ठ पोलीस अधिका:यावर ही कामगिरी असल्याचे सांगण्यात येते. लहान मुलांना त्यांच्या कलेने घेऊन चौकशी करणा:या पोलिसांची गरज आहे; मात्र प्रत्यक्षात हे पथकच नाही.
-अनुराधा सहस्रबुद्धे, 
ज्ञानदेवी संचलित चाईल्ड लाईनच्या प्रमुख