शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बदलीच्या भीतीने तक्रारीच नाहीत

By admin | Updated: March 31, 2015 05:26 IST

वरिष्ठांकडून दिले जाणारे टोमणे... सहकारी पुरुष कर्मचाऱ्यांच्या कार्यालयात अश्लील गप्पा... महिलांच्या दिसण्या-उठण्यावरून होणारे विनोद...

पुणे : वरिष्ठांकडून दिले जाणारे टोमणे... सहकारी पुरुष कर्मचाऱ्यांच्या कार्यालयात अश्लील गप्पा... महिलांच्या दिसण्या-उठण्यावरून होणारे विनोद... महिला सहकाऱ्यांविषयी गॉसीपिंग... संगणकावर अश्लील छायाचित्र पाहणे... हा अनुभव सरकारी कार्यालयांमधील अनेक महिला कर्मचाऱ्यांना येतो. पण वरिष्ठांविरोधात तक्रार केल्यास गैरसोयीच्या ठिकाणी बदली होईल अथवा ‘सीआर’ (सेवा पुस्तिका) खराब होईल या भीतीने अनेक महिला तक्रारच करत नसल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण, प्रतिबंध आणि निवारण करण्यासाठी प्रत्येक सरकारी, निमसरकारी आणि खासगी आस्थापना असलेल्या कार्यालयांमध्ये विशाखा तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. अनेक शासकीय कार्यालयांमध्येच या समित्या स्थापन झाल्या नसल्याचा धक्कादाायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, मध्यवर्ती इमारत, जिल्हा परिषदेच्या अंतर्गत सुमारे ५१ सरकारी कार्यालये आहेत. मात्र, यापैकी केवळ २९ कार्यालयामध्ये विशाखा समिती स्थापन झाली आहे. समित्या स्थापन झालेल्या १९ कार्यालयांमध्ये गेल्या दोन वर्षांत एकही तक्रार दाखल न झाल्याने समितीच्या सदस्यांची बैठक झाली नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात आलेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.काही महिला कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. यामध्ये काही सरकारी कार्यालयामध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या नगण्य आहे. अशा ठिकाणी पुरुष सहकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जातो. वरिष्ठांकडूनदेखील कामाची वेळ संपत आल्यावर एखादी फाईल काढण्यास सांगितले जाते. इतर कामांचा राग महिला कर्मचा-यावर काढला जातो.