शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात गजा मारणे टोळीवर ११६ गुन्हे

By admin | Updated: December 3, 2014 03:07 IST

शहरामध्ये पुन्हा एकदा टोळी युद्धाला तोंड फुटले असून पोलिसांनी संघटीत गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडण्यासाठी कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे

पुणे : शहरामध्ये पुन्हा एकदा टोळी युद्धाला तोंड फुटले असून पोलिसांनी संघटीत गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडण्यासाठी कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. कुख्यात गजा मारणे टोळीविरुद्ध गेल्या आठ ते दहा वर्षात ११६ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. गजा मारणेसह त्याच्या साथीदारांविरुद्ध असलेल्या गुन्ह्यांची सद्यस्थिती पोलिसांकडून तपासली जात असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजा मारणेच्या फार्महाऊसवर छापा टाकून त्याची मोटार ताब्यात घेतल्याचे सह पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी सांगितले.गजा मारणेला किती केसेसमध्ये जामीन मिळाला आहे व तो किती गुन्ह्यांत फरार आहे याची माहिती काढायला सुरुवात करण्यात आली आहे. ज्या गुन्ह्यांमध्ये याच्याविरुद्ध वॉरंट बजावण्यात आलेले असेल त्यामध्ये त्याला अटक करण्यात येणार आहे. टोळीच्या कोणकोणत्या सदस्यांवर एमपीडीएची कारवाई करता येईल याचा अभ्यास सुरु आहे. यासोबतच शहरातील अन्य टोळ्यांमधील सक्रीय सदस्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. या टोळीतील गुंडांचा पुर्वेतिहास आणि गुन्ह्यांची माहिती काढून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. सध्या शहरामध्ये १५ पेक्षा अधिक गुन्हेगारी टोळ्या कार्यरत असल्या तरी गजा मारणे आणि घायवळ टोळी सोडल्यास अन्य टोळ्या शांत आहेत. याच दोन टोळ्यांनी शहरात धुमाकुळ घातला असून या टोळ्यांचे कंबरडे मोडण्याचा निर्धार पोलिसांनी केला आहे. त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष असल्याचेही कुमार म्हणाले. अत्यंत आक्रमकपणे पोलिसांची कारवाई सुरु होणार असून टोळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी बाह्या मागे सारल्या आहेत. (प्रतिनिधी)