शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

...तर भारताचा इतिहास वेगळा राहिला असता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:26 IST

पुणे : “काळाला काय हवे हे ओळखणारे द्रष्टे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि यशवंतराव होळकर होते. या दोघांना दीर्घायुष्य ...

पुणे : “काळाला काय हवे हे ओळखणारे द्रष्टे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि यशवंतराव होळकर होते. या दोघांना दीर्घायुष्य मिळाले असते तर भारताचा इतिहास कदाचित वेगळा असता,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. हरी नरके यांनी केले.

महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानच्या वतीने इतिहास संशोधक संजय सोनवणी लिखित ‘द अनसंग हिरो ऑफ इंडिया -महाराजा यशवंतराव होळकर’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन प्रा. हरी नरके यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार गोपीचंद पडळकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि लेखक संजय सोनवणी आणि प्रतिष्ठानचे सचिव प्रकाश खाडे उपस्थित होते.

इतिहासकार हे मेहनत करून पुस्तके लिहितात. पण, ती योग्यरीत्या समाजासमोर आणली जात नाहीत हे दुर्दैव असल्याची खंत प्रा. नरके यांनी व्यक्त केली. उदात्तीकरण म्हणजे इतिहास नाही. इतिहासाची वस्तुनिष्ठ मांडणी करणे महत्त्वाचे असते. कोणताही इतिहास अंतिम नसतो. तो काळानुरूप नव्याने उलगडत जातो. असा इतिहास अभ्यासपूर्ण मांडणीद्वारे नव्या पिढीसमोर मांडला पाहिजे, असे ते म्हणाले.

“महाराजा यशवंतराव होळकर यांच्यासारखा महान पराक्रम गाजविणाऱ्या राजाने कधी विश्रांती घेतली नाही. सतत संघर्ष आणि लढाई केली. पण त्यांच्याबद्दल कुणी साधी माहिती देखील करून घेत नाही. या महापुरुषांबद्दल थोडी कृतज्ञता निर्माण झाली पाहिजे,” असे सोनवणी म्हणाले. आजही ऐतिहासिक अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी साधने उपलब्ध नाहीत. आम्ही मालिका, चित्रपट आणि कादंबरीला इतिहास समजतो. पण तो इतिहास नाही. आपल्या शिक्षण प्रवाहात इतिहासाचे धडे देणारी दृष्टी देखील नाही, असे सोनवणी म्हणाले.

-----------------------------------------------