शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

...मग घरी आणून द्या स्लिप

By admin | Updated: October 15, 2014 05:17 IST

आपले नाव मतदारयादीत आहे की नाही, हे पाहण्यासाठी एक महिला शाळेत येते, यादीत नाव असल्याचे दाखविल्यानंतर तेथील शिक्षिका त्यांना आता आला आहात

पुणे : आपले नाव मतदारयादीत आहे की नाही, हे पाहण्यासाठी एक महिला शाळेत येते, यादीत नाव असल्याचे दाखविल्यानंतर तेथील शिक्षिका त्यांना आता आला आहात, तर मतदान स्लिप घेऊन जा, असे म्हणून त्यांच्या घरातील सर्व लोकांच्या स्लिपची यादी तिच्यासमोर धरते, त्यावर या महिलेचे उत्तर ऐकून ती शिक्षिकाच चाट पडते़ ती महिला म्हणते, तुम्हाला घरी जाऊन स्लिप वाटायला सांगितले आहे ना, मग घरी आणून द्या, मी घेऊन जाणार नाही़ निवडणूक आयोगाने सर्व मतदारांना मतदान स्लिपा प्रत्येकाच्या घरी जाऊन देण्याचा आदेश दिला आहे़ एकेका शिक्षक, शिक्षिकांकडे जवळपास एक हजार व त्याहून अधिक मतदार स्लिपा देण्यात आल्या आहेत़ पण, अनेक ठिकाणी त्यांची मतदारांकडून अडवणूक होत असल्याने हे शिक्षक वैतागले आहेत़ त्यांच्या समस्यांकडे लक्ष सोडा; पण त्या ऐकून घेण्याची कोणाची तयारी नाही़ फक्त स्लिपा वाटून झाल्या की नाही, इतकेच विचारले जात आहे़ शहरी भागात हा मोठा प्रश्न शिक्षकांना भेडसावत आहे़ निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैशाचे वाटप होते़ याचा सर्वत्र बोलबाला आहे़ त्याचाही स्लिपा वाटण्यास गेलेल्या महिलांना त्रास सहन करावा लागतो़ या महिला एखाद्या झोपडपट्टीत गेल्या आणि तेथे त्यांनी नावे विचारून स्लिपा देण्यास सुरुवात केली, त्यांना पहिला प्रश्न विचारला जातो, किती पैसे आणलेत़ आम्ही सरकारी कर्मचारी आहोत, पैसे नाही स्लिपा वाटतोय, असे सांगितल्यावर त्यांच्याकडून मग तुमचा काय उपयोग, असे उत्तर येते़ अनेकदा घरे बंद असतात, पण, शेजाऱ्यांकडून स्लिपा घेतल्या जात नाही़ तुम्ही ते घरी आल्यावर पुन्हा या़ घरी कधी असतात, असे विचारले तर आम्हाला माहिती नाही, अशी उत्तरे दिली जातात़ त्यामुळे एका इमारतीत दोनदा तीन-चार जिने चढून जाण्याची वेळ येत असल्याचे या शिक्षिकांनी सांगितले़ ज्यांनी स्थलांतर केले आहे, अशांची लोकसभा निवडणुकीत नावे वगळली गेली होती़ त्यांनी पुन्हा जुन्याच मतदारसंघात आपली नावनोंदणी केली आहे़ पण, सध्या ते तेथे राहत नसल्याचे या शिक्षकांना आढळून आले आहे़ त्यामुळे त्यांना स्लिपा कोठे नेऊन द्यायच्या हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे़ (प्रतिनिधी)०