शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

...तर शहराच्या विकासाला ब्रेक

By admin | Updated: April 22, 2017 04:03 IST

भाजप बहुमताच्या जोरावर विरोधकांना विश्वासात न घेता संकुचित विचाराने काम करत आहे. यामुळे भविष्यात शहराच्या विकासाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे

पुणे : भाजप बहुमताच्या जोरावर विरोधकांना विश्वासात न घेता संकुचित विचाराने काम करत आहे. यामुळे भविष्यात शहराच्या विकासाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. शहराच्या विकासाच्या प्रश्नांवर विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन काम करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँगे्रसच्या शहराध्यक्षा खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी येथे केले. महापालिकेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजपाने बहुमताच्या जोरावर तब्बल ३५ टक्के अधिक दराची निविदा असलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याचा प्रस्ताव मान्य केला. या पार्श्वभूमीवर वंदना चव्हाण यांनी शुक्रवारी महापालिकेत पत्रकार परिषद घेऊन भाजपाच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, केंद्राच्या निधीतून कात्रज ते फुरसुंगी या संपूर्ण बाह्यवळण मार्गाचे काम पूर्ण होत असले तर त्याचे स्वागतच करू, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. या वेळी महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते चेतन तुपे उपस्थित होते. चव्हाण म्हणाल्या, की राष्ट्रवादी काँगे्रसची दहा वर्षे महापालिकेमध्ये सत्ता होती. निवडणुका सोडल्यास आमच्या पक्षाने सर्व विरोधी पक्षांना सोबत घेऊनच सभागृहात काम केले आहे. याची कल्पना भाजपलाही आहे. परंतु नुकतेच सत्तेत आलेल्या भाजपाने विरोधी पक्षांना विश्वासात घेणे तर दूरच; परंतु सभागृहातील बसण्याच्या जागांचे वाटप, सभागृहात बोलू न देणे असे संकुचित वृत्तीचे राजकारण केले आहे. यामुळे प्रशासनावर अंकुश राहणार नाही आणि शहराच्या विकासाला खीळ बसेल. (प्रतिनिधी)कात्रज चौकात सोमवारी राष्ट्रवादीचे आंदोलनसभागृहनेते श्रीनाथ भिमाले आता सांगताहेत हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करून केंद्राच्या निधीतून त्याचा विकास करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. असे होते तर भिमाले यांनी सभागृहातच सांगायला हवे होते. या ठिकाणी पादचारी भुयारी मार्गासह वाहतूक सुधारणेसाठी आवश्यक ती कामे करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नगरसेविका अमृता बाबर, पक्षाचे पदाधिकारी नमेश बाबर यांच्या नेतृत्वाखाली २४ एप्रिलला या चौकात आंदोलन करण्यात येणार असल्याचे खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण आणि चेतन तुपे यांनी सांगितले.राष्ट्रवादीचे पक्षीय राजकारण : टिळेकरशहराचा बाह्यवळण रस्ता असलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून प्रचंड दुरवस्था झाली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोकवस्ती वाढली आहे. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वारंवार अपघात होत आहेत. यामुळे या रस्त्यांसाठी गेल्या वीस वर्षांपासून आम्ही तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रस झगटत होतो. वेळोवेळी मागणी करुन देखील या रस्त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुरेसा निधी टाकला नाही. यासाठी अनेक आदोलने केली त्यानंतर तुटपुंजी तरतुद करण्यात आली. आता विरोधक म्हणून बोलत असलेल्या याच राष्ट्रवादी काँग्रेसने अभियात्रिकी पुले ते पाटील इस्टेट दरम्यानचा उडाण पुलाची निविदा तब्बल ३५. ११ टक्के वाढीव दराने व शिवणे ते म्हात्रे पुल व संगमवाडी ते खराडी नदी काठचा रस्ता डिफर्ड पेमेंट पध्दतीने विकसित करण्यासाठी १८ टक्के वाढीव दराच्या निविदा मंजूर केल्या आहेत.