शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

त्यांचा ‘सेटअप’ विस्कटला

By admin | Updated: November 16, 2016 03:23 IST

नाटकासाठी कथेनुरूप सेट तयार उभारणे, रंगमंचावर आकर्षक प्रकाशयोजना करून रसिकांना भुरळ घालणारे, तसेच नाटक सुरू होण्याआधीपासून ते

पुणे : नाटकासाठी कथेनुरूप सेट तयार उभारणे, रंगमंचावर आकर्षक प्रकाशयोजना करून रसिकांना भुरळ घालणारे, तसेच नाटक सुरू होण्याआधीपासून ते नाटक संपल्यानंतरही राबणारे अशा सर्व पडद्यामागील कलाकारांनाही जुन्या नोटांच्या बंदीचा फटका बसला आहे. प्रसंगानुरूप सेटअप उभारून नाटकात जान आणणाऱ्या पडद्यामागील कलाकारांच्या संसाराचा ‘सेटअप’ मात्र सध्या विस्कटला आहे.५००-१०००च्या नोटांच्या बंदीचा फटका नाटकाच्या पडद्यामागील कलाकारांना बसताना दिसतोय. घरातील दैनंदिन खर्चासाठी सुटे पैसे संपल्याने आता करायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे अनेक नाटकांचे प्रयोग रद्द झाले आहेत. तर काही नाटकांच्या प्रयोगांचे प्रमाण कमी झाल्याने त्याचाही फटका या पडद्यामागील कलाकारांना सोसावा लागत आहे. या कलाकारांना कामाचे पैसे हे रोखीतच मिळत असल्याने अनेकांची बँक खाती नाहीत. तर अनेकांची खाती असली, तरी बँकेतील व्यवहार कसे करायचे, याची फारशी माहिती नाही. त्यातच एटीएम बंद असल्याने सगळ््याच बाजूंनी या कलाकारांची अडचण झालेली आहे.‘चिरंजीवी आईस’ या नाटकाचे नेपथ्य तयार करणाऱ्या कलाकारांनी कष्टाने नेपथ्य तयार करण्यास सुरुवात केली, मात्र नोटाबंदीच्या निर्णयामुळे या नाटकाचा प्रयोगच रद्द झाल्याने या कलाकारांची मेहनत वाया गेली.अशीच काहीशी परिस्थिती लावणी कलावंतांची व निर्मात्यांची झाली आहे. कार्यक्रमाला तिकिट बुकिंगच होत नसल्याने कार्यक्रम रद्द करण्याची वेळ निर्मात्यांवर आली आहे. बँकेतून केवळ २हजाराच्या नोटा मिळत असल्याने पैसे सुटे करण्यात अडचण येत आहे. त्यामुळे या कलाकारांची ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती झाली आहे. (प्रतिनिधी)