शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

डोंगर फोडून मुरमाची होतेय चोरी

By admin | Updated: March 25, 2017 03:24 IST

परिसरातील गव्हाणेवस्ती-ठाकरवाडी या परिसरात डोंगर फोडून मुरुमाची चोरी होत आहे. महसूल विभागातील कर्मचारी व मुरूमचोर यांच्या संगनमताने हा प्रकार होत असल्याचा आरोप होत आहे.

दावडी : परिसरातील गव्हाणेवस्ती-ठाकरवाडी या परिसरात डोंगर फोडून मुरुमाची चोरी होत आहे. महसूल विभागातील कर्मचारी व मुरूमचोर यांच्या संगनमताने हा प्रकार होत असल्याचा आरोप होत आहे.खेड तालुक्याच्या पूर्व भागात सेझ प्रकल्प आला. दावडी, निमगाव या परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी, डोंगर, माळरान सेझने संपादित केले आहेत. सुरुवातीला सेझने जमीन संपादित करण्यात आली होती. नंतर भूसंपादन केलेल्या जागेवर विमानतळाचा प्रस्ताव मांडण्यात आला. परंतु येथील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या होत असलेल्या विरोधामुळे विमानतळ पुरंदर तालुक्यात हलविण्यात आला. सेझसाठी संपादित केलेल्या जमिनीच्या सातबाराच्या उताऱ्यावर अजूनही शिक्के तसेच आहेत. अजूनही काही जागांवरती प्रकल्प उभे न राहिल्याने जमिनी, माळराने, डोंगर मोकळे पडले आहेत. याचाच फायदा घेऊन येथील धनदांडगे राजरोसपणे मुरुमचोरी करीत आहेत. कित्येक वेळा ग्रामस्थांनी तक्रार देऊनही महसूल विभागातील कर्मचारी याकडे काणाडोळा करीत आहेत. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. सुरुवातीच्या सेझ प्रकल्पासाठी शासनाने जमिनीवर शिक्के टाकले होते. त्या वेळी जमिनीतील माती वीट्टभटीवाल्यांना विकण्याचा सपाटा लावला होता. आता ही मुरूमचोरी रोखणार कोण, असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. (वार्ताहर)