शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उरुळी देवाची येथे चोरी फसली

By admin | Updated: March 13, 2016 01:34 IST

उरुळी देवाची येथे आज पहाटे तीन चोरट्यांनी सोनाराच्या दुकानाचे लोखंडी शटर उचकटून चोरी करण्याचा असफल प्रयत्न केला.

लोणी काळभोर : उरुळी देवाची येथे आज पहाटे तीन चोरट्यांनी सोनाराच्या दुकानाचे लोखंडी शटर उचकटून चोरी करण्याचा असफल प्रयत्न केला. परंतु, शटर उचकटल्याचा आवाज आल्याने रहिवासी जागे झाले. त्यांमुळे चोरट्यांना पलायन करावे लागले. तिघांपैकी एकाला नागरिकांनी पाठलाग करून पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.या प्रकरणी सराफ दुकानदार मोहसीन नासीर इनामदार (रा. सावली होम्स, उरुळी देवाची, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. स्थानिक नागरिकांकडून पकडलेला चोरटा अभिमान अण्णा जाधव (वय ४८, रा. परांडा, जि. उस्मनाबाद) याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.पोलीस निरीक्षक बंडोपंत कौंडूभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इनामदार यांचे उरुळी देवाची, अशोकनगर येथे अनमोल ज्वेलर्स हे दुकान आहे. ११ मार्च रोजी त्यांनी सकाळी ११ च्या सुमारास दुकान उघडले. दिवसभर व्यवहार केला व नेहमीप्रमाणे रात्री ८ च्या सुमारास दुकान बंद करून ते घरी गेले.आज (दि. १२) पहाटे तीनच्या सुमारास ३ चोरट्यांनी या दुकानाचे लोखंडी शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, शटर उचकटल्याचा आवाज आल्याने येथे राहत असलेले अमित भाडळे व इतर रहिवासी जागे झाले. लोक येत आहेत हे पाहून तिघे चोरटे पळून जाऊ लागले. नागरिकांनी त्यांचा पाठलाग करून जाधव याला पकडले; परंतु त्याचे दोन साथीदार मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. भाडळे यांनी इनामदार यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. इनामदार तेथे पोहोचले. नंतर पोलिसांना कळविण्यात आले. त्यांनी दुकानाची पाहणी केली असता, लोखंडी शटरचे आतील व बाहेरील कोयंडे तुटलेल्या स्थितीत आढळून आले. मध्यभागी असलेले कुलूप उघडता न आल्याने चोरट्यांना चोरी करता आली नाही. पोलीस हवालदार आर. एल. मोहरकर पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)