लोकमत न्यूज नेटवर्क
चाकण : एचपी कंपनीच्या टँकरमधून अर्थात कॅप्सूलमधून अत्यंत धोकादायकरित्या कनेक्टरच्या सहाय्याने गॅस चोरणाऱ्या तिघांना महाळुंगे पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ३४ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
खेड तालुक्यातील येलवाडी गावच्या हद्दीत शनिवारी (दि ३) पहाटे इंदोरी टोलनाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली.
गुरुदीप महालसिंग संधू (वय ३१, रा. अमृतसर, पंजाब) व रमेश ठक्कराम मंजू (वय २१ रा. येलवाडी ता. खेड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार मात्र पळून गेला आहे. शनिवारी पहाटे ४ च्या दरम्यान वरील तिघे येलवाडी गावच्या हद्दीतील इंदोरी टोलनाक्याजवळ गॅस टँकरच्या १५ टन कॅप्सूल मधून गॅस सिलेंडर टाकीमध्ये कनेक्टरच्या सहाय्याने धोकादायकरित्या गॅसची चोरी करत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करून गुरुदीप व रमेश या दोघांना ताब्यात घेतले आहे.
फोटो : जप्त करण्यात आलेल्या टँकरसह आरोपी व म्हाळुंगे पोलीस