शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

चिंबळीत घरगुती सिलेंडरमधून गॅसची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:30 IST

आळंदी : चिंबळी (ता.खेड) येथे सिलेंडरमधून गॅसची चोरी करतानाचा प्रकार उघडकीस आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी ...

आळंदी : चिंबळी (ता.खेड) येथे सिलेंडरमधून गॅसची चोरी करतानाचा प्रकार उघडकीस आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे १२ लाख ८ हजार १६६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना रविवारी (दि.३) रात्री साडेसातच्या सुमारास चिंबळी हद्दीत ज्ञानेश्वर महाराज व मोतीराम महाराज गॅस सर्व्हिसिंग स्टील होम रिपेअरिंग सेंटर स्वयंभू भारत गॅस नावाच्या दुकानात उघड झाली. याप्रकरणी विलास भगवान खोंडे (शिंदे), सतीश मनोहर परवत, रवींद्र सातकर व नारायण गवळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रवींद्र सातकर यांनी त्यांच्या गॅस एजन्सीमधून अतिप्रमाणात घरगुती गॅसचा साठापुरवून तसेच अन्य आरोपींशी संगनमत करून लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल हे माहीत असून सुद्धा मानवी जीवितास पोहचणाऱ्या कोणत्याही संभाव्य धोक्यापासून सुरक्षित राहण्यास तसेच ज्वालाग्राही पदार्थाबाबत पुरेसा इतका बंदोबस्त करणे गरजेचे असताना त्यास जाणीवपूर्वक टाळून, त्यांच्या ताब्यातील घरगुती भरलेल्या सिलेंडरमधून ०४ किलो वजनाच्या सिलेंडरमध्ये गॅस काढून घेऊन गॅसची चोरी केली.

दरम्यान आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून हा प्रकार उजेडात आणत सिलेंडरच्या टाक्या, वाहन व रोख रक्कम हस्तगत केली. याप्रकरणी पोलीस नाईक मारुती करचुंडे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फोटो ओळ : चिंबळी (ता. खेड) येथे गॅस चोरी प्रकरणात जप्त केलेल्या सिलेंडर टाक्या.(छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)