शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातही थायलंड, उझबेकिस्तान..!, हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 04:24 IST

राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय फोफावला आहे. परदेशी युवतींना या व्यवसायात आणण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून शहरातील

पुणे : राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय फोफावला आहे. परदेशी युवतींना या व्यवसायात आणण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून शहरातील अनेक भागांत ‘थायलंड, उझबेकिस्तान’ तयार झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सुटका केलेल्या परदेशी तरुणींनी आपल्या देशातील गरिबीमुळे या व्यवसायात आल्याचे पोलिसांना सांगितले आहे.अलिकडच्या काळात उच्चशिक्षित तरुणींसोबतच विदेशी तरुणींचा या व्यवसायातील सहभाग लक्षणीयरित्या वाढला आहे. विशेषत: रशिया, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान या भागातून आलेल्या तरुणींची या व्यवसायामधून पोलिसांनी केलेली सुटका त्याची प्रातिनिधीक उदाहरणे असून या व्यवसायातील एजंटांकडून कोट्यवधींची उलाढाल केली जाते.पारंपरिक वेश्याव्यवसायाला गेल्या काही वर्षांत छेद बसला आहे. दक्षिण भारत आणि कोलकाता, बांगलादेश, नेपाळ आदी भागांमधून वेश्याव्यवसायांसाठी मुलींना आणून पुण्यातील वेश्यावस्तीमध्ये विकण्याचे प्रमाण गेल्या वर्षांत घटले आहे. सोशल मीडिया प्रबळ झाल्यापासून ग्राहकांशी वैयक्तिक संपर्क प्रस्थापित करणे अधिकच सोपे झाले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यामध्ये देशविदेशामधून शिक्षण, रोजगार आणि पर्यटनाच्या बहाण्याने येणाºया तरुणी या व्यवसायात अलगदपणे ओढल्या जात आहेत. या व्यवसायात असलेल्या पैशाचे आकर्षण या तरुणींना आकर्षित करण्यास कारणीभूत ठरत आहे. देशामध्ये हायप्रोफाईल वेश्या व्यवसायांच्या यादीमध्ये दिल्ली, मुंबई, बंगळुरूनंतर पुण्याचा क्रमांक लागतो.पुण्यामध्ये कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, येरवडा, खराडीसारख्या भागांमध्ये या व्यवसायाचे प्रमाण अधिक आहे. उत्तम इंग्रजी भाषा अवगत असलेल्या उच्चशिक्षीत तरुणींसह विदेशी तरुणींची मागणी वाढली आहे. पुण्यामध्ये १० ते १२ ‘बडे’ एजंट आणि त्यांचे सहकारी या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. गेल्या वर्षीच पुणे पोलिसांनी या व्यवसायातील माफिया क्वीन असलेल्या कल्याणी देशपांडेवर बेकायदा वेश्याव्यवसायप्रकरणी मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. मात्र, अद्यापही बरेचसे एजंट सक्रिय आहेत.रशिया, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि थायलंड या देशांमधील तरुणींची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. बिझनेस, टुरिस्ट आणि स्टुडंट व्हिसावर आलेल्या काही तरुणी एजंटच्या जाळ्यात अडकतात. या देशांमध्ये असलेली कमालीची गरिबी आणि भारतामध्ये या व्यवसायामधून मिळणारा बक्कळ पैसा पाहता या तरुणी स्वाभाविकच या व्यवसायाकडे आकर्षित होतात. एजंटांकडून त्यांना मिळणाºया ‘आॅफर्स’ स्वीकारल्यानंतर या तरुणींना विविध एजंटांकडे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने देशभरात फिरवले जाते. अगदी पाच हजारांपासून या तरुणींचे दर ठरवले जातात.पुण्यामध्ये वाढलेला ‘उद्योग व्यवसाय’ आणि जमिनींच्या व मालमत्तांच्या खरेदी-विक्रीमधून खुळखुळत असलेल्या पैशामुळे या व्यवसायाला अधिकच ग्राहक मिळू लागले आहेत. विशेषत: लक्षाधिश आणि कोट्यधीश कुटुंबातील ग्राहकांकडे एजंटांचे अधिक लक्ष असते.इंटरनेटवर हजारो वेबसाईट्सच्या माध्यमातून एजंट्सचे मोबाईल क्रमांक सहज उपलब्ध होत आहेत. या वेबसाईट्सवर त्यांच्याकडे उपलब्ध तरुणींची छायाचित्रेही अपलोड केलेली असतात. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्यापर्यंत पोचणे अधिक सोपे झाले आहे. ग्राहकांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधताच त्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर तरुणींची छायाचित्रे पाठविली जातात. हा संपर्क वैयक्तिक आणि सुरक्षित असल्यामुळे ९९ टक्के घटनांमध्ये पोलिसांपर्यंत माहितीच पोहचत नाही. त्यामुळे कारवाईमध्येही मर्यादा येत आहेत. कोट्यवधींची उलाढाल असलेल्या या व्यवसायामधून एजंट आणि त्यांचे बगलबच्चे चांगलेच गब्बर झाले आहेत.‘थाई’ मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय‘थाई’ मसाज सेंटरच्या नावाखाली अनेक ठिकाणी वेश्याव्यवसाय चालत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. थायलंडमधील तरुणींना या पार्लरमध्ये ठेवले जाते. पार्लरमध्ये आलेल्या ग्राहकांना उत्तेजित करून त्यांच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी हजारो रुपये घेतले जातात. सामाजिक सुरक्षा विभागाने गेल्या दहा महिन्यांत अशा मसाज सेंटरवर कारवाई करीत थायलंडच्या १० तरुणींची सुटका केली आहे.रशिया विभक्त झाल्यानंतरनिर्माण झालेल्या कझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान या देशांमध्ये प्र्रचंड गरिबी निर्माण झाली आहे. या देशांमध्ये सध्या रोजगाराच्या संधी नसल्यामुळे तेथील तरुणींना जाळ्यात ओढले जाते. या तरुणींना सहा महिन्यांच्या टुरिस्ट व्हिसावर भारतामध्ये आणले जाते. या देशांमधील अनेक एजंट दिल्लीमध्ये स्थिरावलेले आहेत. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. या तरुणींना त्यांच्या गावामध्येच सहा महिन्यांचे पैसे आगाऊ दिले जातात. त्यानंतर त्यांना दिल्लीमध्ये आणले जाते. त्यांचा पासपोर्ट काढून घेतलाजातो. तेथून त्या विविध मेट्रो सिटीमधल्या एजंटांकडे पुरविल्या जातात. ही संपूर्ण साखळी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने काम करते आहे.