शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

...ठाकरे-पवार सरकारवर आता विश्वास राहिला नाही : खासदार छत्रपती संभाजीराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:10 IST

पुणे : “आर्थिक दुर्बल घटकाचे आरक्षण घेतले, तर इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास (एसईबीसी)चे हक्काचे आरक्षण घेता येणार नाही, असा निकाल ...

पुणे : “आर्थिक दुर्बल घटकाचे आरक्षण घेतले, तर इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास (एसईबीसी)चे हक्काचे आरक्षण घेता येणार नाही, असा निकाल न्यायालयाने दिला असल्याचे असे सरकारी वकिलांनीच आम्हाला सांगितले आहे. त्यामुळे सरकार यावर कोणते पाऊल उचलणार आहे? येत्या २५ जानेवारीला न्यायालयात जी अंतिम सुनावणी होणार आहे, सरकारची भूमिका काय असेल, हा मोठा प्रश्न पडला आहे. सरकार हतबल झाल्याचीच शंका आम्हाला वाटू लागली आहे. त्यामुळे राज्यातल्या सरकारवर आता विश्वास राहिलेला नाही,” अशी टीका खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली.

आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे नाराज झालेल्या मराठा समाजाला ‘इडब्ल्यूएस’चा लाभ देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात, आयोजित पत्रकार परिषदेत गुरुवारी (दि. २४) छत्रपती संभाजीराजे बोलत होते.

छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर दि. २५ जानेवारी रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. या अंतिम सुनावणीत मला गडबड वाटू लागली आहे. आजवर मी नेहमी राज्य सरकारची बाजू घेत होतो. सरकारच्या बाबतीत सकारात्मक होतो. मात्र, यात काही धोका झाला तर याला राज्य सरकारच जबाबदार राहणार आहे.”

ज्यांना कोणाला आरक्षण घ्यायचे असेल ते न्यायालयात जातील आणि आर्थिक दुर्बल घटकाचे आरक्षण घेतील, असे सरकारी वकिलांनीच मला सांगितले, असे छत्रपती संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, राज्य सरकारने हे धोरण राबवू नये. जर यात काही घोटाळा झाला तर याला राज्य सरकारच जबाबदार असेल. कारण, त्यांच्याच वकिलाने त्यांना दिलेला हा सल्ला आहे.

‘सारथी’ हे शाहू महाराजांचे जिवंत स्मारक आहे. मराठा समाजासाठी असणाऱ्या या संस्थेची अवस्था काय झाली आहे? मला समजत नाही नेमके काय सुरू आहे? सरकार ठोस भूमिका घ्यायला तयार नाही. ‘इडब्ल्यूएस’च्या बाबतीत मी सांगितलेले सरकारला पटले. मात्र, एकदमच त्यांनी हा विषय काढला, त्यामध्ये त्यांचे काय गणित आहे, हे मला समजेना,”असे म्हणाले.

चौकट

आंदोलन व्यर्थ जाणार का?

“मराठा समाजातील सर्वजण १० टक्क्यात किती बसतात याचा अभ्यास करावा, किती टक्के आरक्षण मिळणार आहे याचाही अभ्यास करावा. एसइबीसीचे स्वतंत्र आरक्षण होते आणि हे आरक्षण पूर्ण वेगळे. मराठा समाजाने ५८ मोर्चे काढले. ४८ लोकांनी बलिदान दिले. घरदार सोडून अनेकजण १९६७ पासून लढा दिला. अण्णासाहेब पाटील यांनी आत्महत्या केली. हे सगळे व्यर्थ जाणार आहे का, याचे उत्तर सरकारने द्यावे.” -छत्रपती संभाजीराजे