शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘सिजेंटा’च्या अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांकडे पाठ

By admin | Updated: July 9, 2016 03:48 IST

सिजेंटा कंपनीचे अधिकारी मंचर येथे शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आलेच नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकरी साडेआठ हजार रुपये भरपाई टोमॅटो उत्पादक

मंचर : सिजेंटा कंपनीचे अधिकारी मंचर येथे शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आलेच नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकरी साडेआठ हजार रुपये भरपाई टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना देण्याची भूमिका सिजेंटा कंपनीने घेतली आहे. शेतकऱ्यांना ते मान्य नाही. शेतकरी आता आक्रमक भूमिका घेणार असल्याची माहिती शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिली आहे.टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, म्हणून सिजेंटा कंपनीच्या बाणेर (पुणे) येथील कार्यालयात आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्या वेळी तेथील कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मंचर येथे गुरुवारी बैठक घेऊन भरपाईसंदर्भात ठोस निर्णय घेण्याची ग्वाही दिली व त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर बांगर व इतर शेतकरी गुरुवारी बैठकीसाठी बाजार समितीच्या आवारात जमले होते. मात्र कंपनीचे अधिकारी आलेच नाहीत. संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता.शेतकरी मंचर पोलीस ठाण्यात गेले. तेथे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांच्याशी शेतकऱ्यांनी चर्चा केली. गोडसे यांनी सिजेंटा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधला. त्यानंतर संबंधित अधिकारी बांगर यांच्याशी बोलले. सिजेंटा कंपनीचा धोरणात्मक निर्णय झाला आहे. एकरी साडेआठ हजार रुपये भरपाई देण्याचा निर्णय झाला आहे. डिसेंबर, जानेवारी यादरम्यान लागवड झालेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनाही भरपाई देणार असल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी कंपनीच्या निर्णयाला विरोध केला आहे.शेतकऱ्यांना कंपनीचा निर्णय मान्य नाही. आंदोलन करण्याचा इशारा बांगर यांनी दिला आहे. (वार्ताहर)