शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चाचण्या वाढल्या, रुग्ण घटले, पॉझिटिव्हिटी रेट २.५३ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:15 IST

शहरातील दररोजच्या मृत्यूची संख्याही दररोज ४ ते ५ इतकी जात आहे. आठवड्याभरात कोरोनामुळे ३२ रुग्णांचा मृत्यू झाला. आठवड्यात सर्वात ...

शहरातील दररोजच्या मृत्यूची संख्याही दररोज ४ ते ५ इतकी जात आहे. आठवड्याभरात कोरोनामुळे ३२ रुग्णांचा मृत्यू झाला. आठवड्यात सर्वात कमी १२८ तर सर्वात जास्त २९२ रुग्णांचे निदान झाले. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची आठवड्यातील संख्या १५४९ इतकी आहे. आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पॉझिटिव्हिटी रेट ३ टक्कयांहून खाली गेला होता. २-८ आॅगस्ट या आठवड्यात २.६४ टक्के, ९-१५ आॅगस्ट या कालावधीत २.५४ टक्के, १६-२२ आॅगस्ट या आठवड्यात २.४६ टक्के इतका पॉझिटिव्हिटी रेट नोंदवला गेला होता. या तुलनेत २३-२९ आॅगस्ट या कालावधीत पॉझिटिव्हिटी रेट ३.०६ टक्के इतका वाढला. ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या काळात पॉझिटिव्हीटी रेट पुन्हा ३ टक्क्यांहून खाली आला आहे. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी या सणांमध्ये नागरिकांनी गर्दी केल्यास तिसऱ्या लाटेला आपणच आमंत्रण देऊ, असा इशारा वैद्यकतज्ज्ञांकडून दिला जात आहे.

------

आठवडा चाचण्या रुग्ण पॉझिटिव्हिटी रेट

२ - ८ आॅगस्ट ५६,०५७ १४८१ २.६४

९-१५ आॅगस्ट ६०,७७६ १५४४ २.५४

१६-२२ आॅगस्ट ५७,५०४ १४१६ २.४६

२३-२९ आॅगस्ट ५६,४२६ १७३१ ३.०६

३० ऑगस्ट- ५ सप्टें ६१,३७४ १५५७ २.५३

----

शहरातील स्थिती :

शहरात आतापर्यंत ३१ लाख ८० हजार ४३ इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैैकी ४ लाख ९६ हजार ७७२ जण कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. त्यापैैकी ४,८५,५६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७३ टक्के इतके आहे. शहरात ८९४९ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या २०८ कोरोनाबाधितांची परिस्थिती गंभीर असून, २९० रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या २२५८ इतकी आहे.

----------