शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सारसबाग मंदिरात घुसले दहशतवादी

By admin | Updated: April 8, 2016 01:11 IST

सारसबागेचा गजबजेला परिसर... तळ्यातल्या गणपतीचे दर्शन घेणारे भाविक... सकाळच्या त्या आल्हाददायक वातावरणात अचानक पोलीस घुसतात... काही कळायच्या आत बाग आणि मंदिर रिकामी करतात

पुणे : सारसबागेचा गजबजेला परिसर... तळ्यातल्या गणपतीचे दर्शन घेणारे भाविक... सकाळच्या त्या आल्हाददायक वातावरणात अचानक पोलीस घुसतात... काही कळायच्या आत बाग आणि मंदिर रिकामी करतात... मंदिरामध्ये दहशतवादी घुसलेत... त्यांनी एक खोली ताब्यात घेतलीय... शीघ्र कृती दलाचे जवान येतात... ‘आॅपरेशन प्लॅन’ ठरतो... अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या मदतीने जवान ‘स्ट्रॅटेजिकली’ मोहीम यशस्वी करतात... दहशतवाद्यांनी ठेवलेले बॉम्ब शोधण्यात पोलीस यशस्वी होतात... दोन दहशतवादी शस्त्रांसह सापडतात आणि सगळे सुटकेचा नि:श्वास सोडतात...पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला आणि सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी दिलेल्या सूचनांनुसार ‘मॉकड्रिल’ करण्यात आले. सकाळी साडेदहाच्या सुमारास सारसबाग मंदिरामध्ये दहशतवादी घुसल्याचा कॉल नियंत्रण कक्षाला देण्यात आला. त्यानंतर स्थानिक स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दीपक निकम, निरीक्षक (गुन्हे) राम राजमाने हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धावले. नियंत्रण कक्षातून माहिती मिळताच शीघ्र कृती दलाचे जवान सारसबागेजवळ दाखल झाले. परिमंडल २ चे उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त मिलिंद मोहितेही या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. तसेच, सर्वच विभागांचे उपायुक्त, सहायक आयुक्त वॉकीटॉकी आणि चॅनलवरून पोलिसांना सूचना देत होते. सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद आणि अतिरिक्त आयुक्त सी. एच. वाकडे स्वत: या मोहिमेवर देखरेख ठेवून होते.स्वारगेटकडून तसेच मित्र मंडळ चौकाकडून सारसबागेकडे येणारा रस्ता पोलिसांनी बंद केला होता. त्या रस्त्यांवरची वाहतूक वळवण्यात आली होती.