शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

स्वारगेट परिसरात दहशत पसविणारा गुंड स्थानबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:16 IST

पुणे : स्वारगेट, गुलटेकडी परिसरात गंभीर गुन्हे करून दहशत निर्माण करणाऱ्या गुंडाला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एमपीडीए कायद्यान्वये ...

पुणे : स्वारगेट, गुलटेकडी परिसरात गंभीर गुन्हे करून दहशत निर्माण करणाऱ्या गुंडाला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करून त्याची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.

फैजल ऊर्फ गट्ट्या करीम शेख (वय २५, रा. इंदिरानगर, गुलटेकडी) असे त्याचे नाव आहे.

शहरात सक्रिय व दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण पोलीस आयुक्त गुप्ता यांनी अवलंबिले आहे. त्यानुसार मागील वर्षभरात ११ गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध केले असून, या नव्या वर्षात ४ सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई केली आहे.

फैजल शेख याच्याविरुद्ध कोयता, तलवार यासारखी हत्यारे बाळगून खुनाचा प्रयत्न, खंडणी, विनयभंग, दुखापत, दंगा, चोरी, जबरी चोरी, बेकायदा शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. गेल्या ४ वर्षांत त्याच्याविरुद्ध ५ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशतीमुळे कोणी नागरिक तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही.

स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी एमपीडीए कायद्यान्वये फैजल शेख यांच्या स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव तयार करून पोलीस आयुक्त गुप्ता यांना सादर केला. अमिताभ गुप्ता यांनी प्रस्तावाची पडताळणी करून फैजल शेख याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला.