शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

टेरेस गार्डन : आजच्या काळातील ‘एक्स्टेंडेड लिविंग रूम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:07 IST

पूर्वी लोकांना जितके ‘इंटेरियर/ बिल्डिंग डिझाइन’मध्ये रस असे, त्यापेक्षा खूप कमी लोकांना लँडस्केपमध्ये रुची असे. परंतु बदललेल्या परिस्थितीत, झाडांचे, ...

पूर्वी लोकांना जितके ‘इंटेरियर/ बिल्डिंग डिझाइन’मध्ये रस असे, त्यापेक्षा खूप कमी लोकांना लँडस्केपमध्ये रुची असे. परंतु बदललेल्या परिस्थितीत, झाडांचे, फुलांचे महत्त्व शहरी माणसाला नव्याने जाणवू लागले आहे. अशातच सध्या टेरेस गार्डनकडे अनेक बंगले/ प्रायव्हेट टेरेस मालकांचा ओढा वाढला आहे.

पुण्यासारख्या भरपूर झाडांनी नटलेल्या शहरात, आपल्या सुंदर, सुशोभित टेरेस गार्डनमधून बाहेरच्या निसर्गाचा आनंद घेण्याची, चहाचा कप हातात घेऊन घरच्या मंडळींबरोबर गप्पा मारण्याची मजा काही औरच असते! आपल्या वातावरणात अनेक प्रकारची झाडे वाढू शकतात. त्याचा आपल्याला अनेक स्तरांवर उपयोग होऊ शकतो.

टेरेस गार्डनबद्दल सर्वात खास गोष्ट म्हणजे आपल्या गच्चीतील बाग ही आपण स्वतः, घरच्या काही मोजक्या मंडळींबरोबर ‘DIY’ पद्धतीने साकारू शकतो. ‘वीकेंड टू वीकेंड’ असे काम विभागून एका महिन्याच्या आत आपण उत्तम बाग आपल्या गच्चीत तयार करू शकतो, त्यामुळे अनेकांचा वाढता कल याकडे दिसतो आहे. ‘इन्स्टाग्राम’ ‘फेसबुक’वर फोटो/ स्टोरी पोस्ट करण्यासाठी आपल्या स्वतःच्या बागेतले फोटोपेक्षा हक्काची ‘ग्रीन बॅकग्राउंड’ ती कुठे?

घरच्या गच्चीची रचना करत असताना उन्हाची दिशा बघून मग झाडांची आखणी करणे उत्तम असते. जी झाडे कायम उन्हात टिकू शकतात, अशा झाडांची मांडणी गच्चीतील उन्हाच्या भागात करावी. ‘सेमी शेड लाविंग’ अर्थात कमी उन्हाची, सावलीत वाढणारी/ ‘इन्डोर’ अशा प्रकारे झाडांची विभागणी केल्यावर - एक छोटा प्लान/ आराखडा करून मग गच्चीतील बागेच्या कामाला सुरुवात करावी. आपल्याला हव्या असलेल्या झाडांची, रोपांची यादी करून घ्यावी म्हणजे आपल्याला नर्सरीमध्ये गेल्यावर गोंधळून जायला होत नाही. बागकामासाठी माती, कुंडी,इत्यादी सामग्री हल्ली ऑनलाइनदेखील मागवता येते. झाडांचे प्रकार ‘ट्री’, ‘श्रब’, ‘बुश’, ‘ग्रास’ अशा प्रकारे उंची व वाढीद्वारे असते. त्याची माहिती देणारे अनेक ब्लॉग आपल्याला इंटरनेटवर उपलब्ध असतात.

टेरेस मोठी असल्यास दोन/तीन लेयरमध्ये झाडांचे रोज तयार केल्यास अतिशय आकर्षक दिसते. फुलझाडे, देशी फळांची झाडे, लीलीचे प्रकार, गणपती उत्सवात लागणारी पत्री, फुले, केवडा हे घरच्या कुंड्यात सहज येतात. पुण्याजवळच्या अनेक नर्सरीमध्ये ती सहज उपलब्धही असतात.

बाग करताना, पालापाचोळा, बागेतील कचरा याची विल्हेवाट इतर कचऱ्याप्रमाणे न लावता, त्याचे रूपांतर घरच्या घरी खतात करणे अतिशय सोपे आणि पर्यावरणपूरक असते. एका रिकाम्या मोठ्या कुंडीत पालापाचोळा जमा करून त्यात गांडूळ सोडून द्यावी. ३-४ महिने त्यात हळूहळू भर घालत खालचा भाग मोकळा करत जावा. ४ महिन्यांनंतर खाली काळ्या रंगाचे उत्तम सेंद्रिय खत तयार होते. याचबरोबर, आपल्या घरातील भाजीपाला, चहाचा चोथा हे मिश्रण करून झाडांना घातल्यास त्याचा वास येत नाही व झाडांना नैसर्गिक पोषण मिळत राहते.

पाण्याची परिस्थिती लक्षात घेता, एकदा बागेची रचना निश्चित झाली की ‘ड्रीप इरिगेशन’ करून घ्यावे. बागेची रचना अधिक खुलून येण्यासाठी बागेच्या मध्यभागी कमळाचे एखादे कुंड ठेवून त्यात गप्पी मासे सोडून द्यावे. बागेत आकर्षक वॉटरप्रूफ प्रकाशयोजना, लँपशेड लावून रात्रीच्या वेळेस बसण्यास अतिशय सुंदर व प्रसन्न वातावरण तयार होते. आऊटडोर स्पीकर्स, प्रोजेक्टर स्क्रीन लावल्यास क्रिकेट मॅच, फिल्म स्क्रीनिंग सहज करू शकतो. ‘टेरेस बार’ ही थीम आपल्या वातावरणात अतिशय उपयुक्त ठरते. बागेत टेराकोटाची शिल्प, बसण्यासाठी आकर्षक बेंच, बार्बेक्यू पिट, बेसिन अशी व्यवस्था केल्यास बागेचे रूपांतर पावसाळा सोडून इतर सर्व महिने – ‘एक्स्टेंडेड लिविंग रूम’ म्हणून आपण नक्की करू शकतो!

- सलील सावरकर

पार्टनर - ट्वेंटी एट आर्किटेक्ट्स, पुणे | माय होमस्टेड ॲग्रीकल्चरल सर्विसेस