शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

थेऊरमध्ये तणाव

By admin | Updated: November 18, 2014 03:21 IST

थेऊर येथे दोन गटांतील हाणामारीत २ जण जखमी झाले असून, गावात तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही गटांनी एकामेकांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केल्या

उरुळी कांचन : थेऊर येथे दोन गटांतील हाणामारीत २ जण जखमी झाले असून, गावात तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही गटांनी एकामेकांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केल्या. पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या बंदोबस्तामुळे गावाला छावणीचे स्वरूप आले. काल (दि. १६) रात्रीच्या सुमारास गावचे सरपंच नवनाथ काकडे यांचा गट व गावातील कांबळे गटात बाचाबाची, शिवीगाळ होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. यामध्ये दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र बाबू कांबळे (वय ३१, रा. थेऊर भीमनगर) यांनी दिलेल्या फर्यादीनुसार, थेऊरचे सरपंच नवनाथ तुकाराम काकडे, महादेव दामोदर काकडे, रामभाऊ तुकाराम कुंजीर, कैलास महादेव काकडे, संदीप रामभाऊ कुंजीर, विनोद तुकाराम काकडे व इतरांविरुद्ध फिर्यादीला रिव्हाल्व्हर दाखविणे, शिवीगाळ करणे, लोखंडी गज व हॉकी स्टिकने मारणे इत्यादी आरोपावरून काकडे गटाच्या लोकांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. संतोष किसन काकडे (वय ३६), किरण रामभाऊ काकडे (वय १९, दोघे रा. काकडे वस्ती थेऊर), तसेच सतीश बाळासाहेब गावडे (वय २१, रा. थेऊर बसस्टॉप), दत्तात्रय कुंडलिक काकडे (वय २५), संजय महादेव काकडे (वय २९, रा. थेऊर गणपती मंदिरामागे) यांना अटक करण्यात आली आहे. काकडे गटाचा सचिन कुंडलिक बोडके (वय २३, रा. थेऊर, बोडकेवस्ती) याच्या फिर्यादीनुसार मारुती पोपट कांबळे, राजेंद्र बाबूराव कांबळे, नितीन देवराम कांबळे, आनंद शिवाजी वैराट, सिद्धार्थ उमाकांत कांबळे, पराग प्रशांत कांबळे, दादा विकास कांबळे, दिनेश हरीभाऊ जाधव, कुमार बाळासाहेब नितनवरे, भाऊ कांबळे, बाळा वाघमारे, राज कांबळे, युवराज डांगरे (सर्व रा. थेऊर, ता. हवेली, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गावाच्या हद्दीत बँक आॅफ महाराष्ट्रचे असणारे एटीएम फोडत असताना फिर्यादीने हटकले असता त्यांतील मारुती पोपट कांबळे याने हातातील गजाने, काठीने जबर मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच शिवीगाळ करून दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली, या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला.सुनील ऊर्फ बाळा गौतम वाघमारे (वय २६, रा. थेऊर) व कुमार गेनबा नितनवरे (वय २६, रा. थेऊर) या दोघांना अटक केली आहे. (वार्ताहर)