शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तेंडुलकर आजोबा झाले सांता

By admin | Updated: December 22, 2016 02:32 IST

सांताचा वेश परिधान करून एक व्यक्ती बालचमूंच्या अचानक पुढ्यात आली अन् सर्वांच्या चेहऱ्यावरच्या कळ्या आपसूकच खुलल्या!

पुणे : सांताचा वेश परिधान करून एक व्यक्ती बालचमूंच्या अचानक पुढ्यात आली अन् सर्वांच्या चेहऱ्यावरच्या कळ्या आपसूकच खुलल्या! हा सांता म्हणजे आपले लाडके व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर आहेत हे कळले, तेव्हा तर निरागस मुलांचा आनंद अधिकच द्विगुणित झाला. अन् मग या सांताकडून चॉकलेट, आवडत्या वस्तू घेण्यासाठी मुलांची धांदल उडाली.ख्रिसमस ट्री, बेल, फुग्यांनी सजवलेले सभागृह अशा प्रसन्न वातावरणात जीवधारा शाळेतील विशेष मुलांनी लाडक्या तेंडुलकर आजोबांसोबत ख्रिसमस पार्टी साजरा केली. नाताळ सणाच्या निमित्ताने मैत्र युवा फाउंडेशनच्या वतीने विशेष मुलांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फाउंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे, जीवनधारा मतिमंद शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता शिंदे, यश पंडित व मोठ्या संख्येने विद्यार्थी व तरुण कार्यकर्ते उपस्थित होते. मंगेश तेंडुलकर यांनी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी सांताची वेशभूषा केली होती. या वेळी त्यांनी विशेष मुलांना बक्षिसांचे वाटप केले; त्याचबरोबर मुलांसोबत ‘जिंगल बेल’ गाण्यावर ठेका धरला. त्यांच्या उपस्थितीने एक वेगळाच माहोल सभागृहात निर्माण झाला. या वेळी मुलांना विविध खेळणी, खाऊ, कपडे यांचे वाटप फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले. (प्रतिनिधी)