शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

‘इलेक्शन फंड’साठी भाजपाकडून समाविष्ट गावांसाठी निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या अकरा गावांमध्ये मलवाहिन्या आणि एसटीपी प्लांट उभारण्यासाठी ३९२ कोटींची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या अकरा गावांमध्ये मलवाहिन्या आणि एसटीपी प्लांट उभारण्यासाठी ३९२ कोटींची काढलेली निविदा म्हणजे पालिकेच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या (एसटीपी) जागाच ताब्यात नसतानाही निविदा काढण्यात आली असून ठराविक ठेकेदाराला फायदा मिळवून देण्यासाठी हा खटाटोप सुरु आहे. भाजपाने ‘इलेक्शन फंड’साठी हा घाट घातल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला आहे.

‘मनसे’चे शहराध्यक्ष तथा पालिकेचे गटनेते वसंत मोरे, नेते बाबू वागस्कर यांनी सोमवारी (दि. १५) पत्रकार परिषदेत हे आरोप केले. मोरे म्हणाले की, निविदेमध्ये टाकलेल्या अटी व शर्ती ठराविक ठेकेदाराला नजरेसमोर ठेवून टाकल्या आहेत. ड्रेनेज विभागाचे अधिकारी आणि दोन ठेकेदारांचे फोन कॉल डिटेल्स तपासले जावेत आणि दोषींवर कारवाई करावी. मांजरी व केशवनगर येथे दोन एसटीपी प्लांट उभारण्यासाठी १० हेक्टर जागेची गरज आहे. यापैकी मांजरीची जागा महात्मा फुले कृषी विद्यापीठाची आहे. अद्याप एकाही जागा मालकाशी भूसंपादनाबाबत पत्रव्यवहार झालेला नाही.

मे. खिलारी इन्फ्रास्टक्चर कंपनीला पालिकेने २०१६ ते २०१८ अशी सलग दोन वर्ष काळ्या यादीत टाकले होते. या कंपनीला पुन्हा कामे देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया राबविणे आवश्यक असतानाही केवळ काळ्या यादीचा कालावधी संपल्याचे कारण देत पुन्हा काम देण्यात आले आहे. पात्र ठेकेदाराला ‘मोबीलायजेशन अ‍ॅडव्हान्स’ म्हणून १० टक्के अर्थात सुमारे ४० कोटी रुपये देण्यात येणार आहे. राज्य शासनाने अशा स्वरुपाची रक्कम देण्यास स्थानिक स्वराज्य संस्थांना मनाई केलेली आहे. तरीही ही रक्कम का दिली जात आहे असा सवाल मोरे व वागस्कर यांनी केला.

चौकट

‘मनसे’चे आरोप म्हणजे विकासाला खीळ

“मनसेने केलेल्या आरोपांमधून केवळ समाविष्ट गावांचा विकास रोखण्याचा आणि विकास कामांना खीळ घालण्याचा प्रयत्न दिसतोय. बिनबुडाच्या आरोपांमुळे विकास कामांना खीळ बसली तर या गावांचे नुकसान होणार आहे. या गावांच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक त्या विकासकामांना प्राधान्य दिले जात आहे.”

- गणेश बिडकर, सभागृह नेता