शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारप्रकरणी दहा वर्षे सक्तमजुरी

By admin | Updated: April 26, 2017 02:52 IST

पाचवीत शिकणाऱ्या अकरावर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा राजगुरुनगर

दावडी : पाचवीत शिकणाऱ्या अकरावर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा राजगुरुनगर येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी आज (दि. २५) ठोठावली. गणेश किसन नवले (वय ३५, रा. पिंपरी पेंढार, ता. जुन्नर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.याबाबत माहिती अशी : पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथील सद्गुरु सीताराममहाराज हायस्कूलमध्ये ५ वीत शिकणाऱ्या ११ वर्षीय मुलीस तिच्या नात्यातील आरोपी गणेश किसन नवले याने (१ जानेवारी २०१४ रोजी) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शाळेच्या मधल्या सुटीत पीडित मुलीला खाऊचे आमिष दाखवून जवळच असलेल्या उसाच्या शेतामध्ये नेऊन बलात्कार केला. त्यांनतर त्या मुलीस पुन्हा मोटारसायकलवर बसवून तिच्या शाळेत सोडले.तिची अवस्था पाहून शाळेतील शिक्षिकेने तिची चौकशी केली असता त्या वेळी पीडित मुलगी जोराने रडू लागली. या वेळी शाळेतील इतर शिक्षिका तेथे आल्या आणि त्यांनी तिला धीर देत काय प्रकार घडला, हे विचारले. पीडित मुलीने झालेला प्रकार शिक्षिकांना सांगितला. शाळेतील शिक्षिकांनी तत्काळ पीडित मुलीच्या आई-वडील आणि नातेवाइकांना सांगितले. आरोपी गणेश किसन नवले याच्याविरोधात ओतूर पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली. हा खटला राजगुरुनगर येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात सुरू होता. त्याचा निकाल आज जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी दिला.(वार्ताहर)