शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काराच्या गुन्ह्यात दहा वर्षांची शिक्षा

By admin | Updated: December 24, 2016 00:07 IST

अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तिच्यावर वारंवार केलेल्या बलात्कारप्रकरणी आरोपी तरुणाला बाललैंगिक

राजगुरुनगर : अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तिच्यावर वारंवार केलेल्या बलात्कारप्रकरणी आरोपी तरुणाला बाललैंगिक अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या गुन्ह्यात १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा, येथील अतिरिक्त व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी ठोठावली. आळंदी येथे गेल्या वर्षी हा गुन्हा घडला होता. लक्ष्मण दिलीप देशमुख (वय २४, रा. जराळा, ता. परतूर, जि. जालना, हल्ली रा. आळंदी, ता. खेड) असे आरोपीचे नाव आहे. आळंदी या तीर्थक्षेत्री आळंदी-मरकळ रस्त्यालगत संतोषी माता मंदिरामागील तत्कालीन नगरसेवक अशोक कांबळे यांच्या चाळीत फिर्यादी अल्पवयीन मुलगी आणि आरोपी लक्ष्मण देशमुख राहत होते.मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनसुद्धा तिच्याशी मैत्री करून आणि तिच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आरोपीने तिच्यावर, तिच्या घरात कोणी नसताना, गेल्या वर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत बलात्कार केला. तसेच, २२ मार्च रोजी फिर्यादी एकटी असताना जबरदस्तीने तिला स्वत:च्या खोलीत ओढून नेऊन बलात्कार केला. मात्र, त्या वेळी फिर्यादीच्या वडिलांची चाहूल लागल्याने तिला खोलीत कोंडून तो निघून गेला. यावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या वेळचे सहायक पोलीस निरीक्षक के. आर. कदम आणि पोलीस हवालदार डी. एस. मांडे यांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते. राजगुरुनगर न्यायालयात हा खटला सुरू होता. सरकारी वकील गिरीश कोंबल यांनी या खटल्यात ५ साक्षीदार तपासले. त्यांमध्ये पीडित फिर्यादी मुलगी, तिची वैद्यकीय तपासणी करणारे डॉक्टर आणि तिचे वडील यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी आणि २ हजार रुपये दंड व तो न भरल्यास ३ महिने कारावास, कलम ४५० नुसार ५ वर्षे सक्तमजुरी आणि १ हजार रुपये दंड व तो न भरल्यास १ महिना कारावास, कलम ३४२ अन्वये १ वर्ष सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंड व तो न भरल्यास १ महिना कारावास, अशी शिक्षा ठोठावली.