शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षांनंतर निधी मिळूनही कामे रखडलेलीच!

By admin | Updated: April 6, 2016 01:29 IST

पुणे-सातारा महामार्गाच्या रस्तारुंदीकरणाचे काम करताना अनेक गावांच्या नळपाणी पुरवठा योजनांच्या पाईपलाईन फुटल्या होत्या.

भोर : पुणे-सातारा महामार्गाच्या रस्तारुंदीकरणाचे काम करताना अनेक गावांच्या नळपाणी पुरवठा योजनांच्या पाईपलाईन फुटल्या होत्या. त्या कामासाठी तब्बल १० वर्षांनी ८० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून पाईपलाईनचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला पाईपलाईन टाकण्यास हद्द निश्चित करून दिली जात नसल्याने दोन महिन्यांपासून काम रखडले आहे.त्याचा परिणाम ९ गावांच्या नळपाणीपुरवठा योजनांवर होत असून, आणखी किती दिवस वाट पाहावी लागणार आहे याची शाश्वती नाही. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण व रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या कामाबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. काम त्वरित सुरु न झाल्यास त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.तब्बल १० वर्षे वाट पाहिल्यावर दोन महिन्यांपूर्वी सुमारे ८० लाख रुपयांची मंजुरी मिळाली आहे. महामार्गावरील शिंदेवाडी, खेड शिवापूर, वेळू, वर्वे, नसरापूर, कामथडी, कापूरव्होळ,किकवी, सारोळे या गावांतील नळपाणी पुरवठाच्या पाईपलाईन तुटलेल्या होत्या. १० वर्षांपूर्वी पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील रस्तारुंदीकरणाच्या वेळी रस्त्याच्या आजूबाजूने गेलेल्या गावातील नळपाणी पुरवठा योजनांच्या पाईपलाईन फुटल्या होत्या. त्यामुळे गावांसह वाड्या-वस्त्यांवरील पाणीपुरवठा खंडित झाला आहे. तेव्हापासून हे काम करण्याची मागणी स्थानिक शेतकरी करत होते. मात्र दशकभराने हे काम सुरू होण्याची आशा असताना ठेकेदारास पाईपलाईन जोडण्यासाठी रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून हद्द निश्चित करून मिळत नसल्याने हे काम गेल्या दोन महिन्यांपासून सुरु करता येत नाही. दुसरीकडे हे काम वेगात सुरू असल्याचे महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सांगतात. मात्र प्रत्यक्ष काम अद्याप सुरुच झाले नसल्याचे दिसून येते. त्यामुळे रस्त्याच्या सहा पदरीकरणाच्या रुंदीकरणाचे काम करणाऱ्या रिलायन्स इन्फ्रा व महामार्ग प्राधिकरण यांच्यात ताळमेळ नाही. दोघांकडून टोलवाटोलवी सुरूअसल्याचे दिसून येत आहे. या वादात मात्र लोकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.(वार्ताहर)