शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५२ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

दहा हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

By admin | Updated: September 4, 2016 04:17 IST

यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्न आणि शांततेत पार पाडण्यासाठी तब्बल दहा हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून या वेळी साडेचार हजार सार्वजनिक गणेश

पुणे : यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्न आणि शांततेत पार पाडण्यासाठी तब्बल दहा हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून या वेळी साडेचार हजार सार्वजनिक गणेश मंडळांनी परवानगी घेतलेली आहे. गणेश प्रतिष्ठापना आणि विसर्जन मिरवणुकांदरम्यान ढोल-ताशा पथके असोत अथवा स्पीकर असोत, सर्वांनी आवाजाची मर्यादा पाळणे बंधनकारक असून, ही मर्यादा ओलांडल्यास मंडळांसह संबंधित पथकांवरही गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, समन्वयासाठी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत दिली.सोमवारपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी पोलिसांनी केलेल्या नियोजनाची माहिती शुक्ला यांनी दिली. या वेळी सह आयुक्त सुनील रामानंद, अतिरीक्त आयुक्त (गुन्हे) सी. एच. वाकडे, परिमंडल एकचे उपायुक्त सुधीर हिरेमठ, श्रीकांत पाठक, पंकज डहाणे, गणेश शिंदे उपस्थित होते. पुण्याच्या गणेशोत्सवाला मोठे महत्त्व असून, राज्यातील मानाचा हा उत्सव आहे. गणेश मंडळांसह ढोलताशा पथकांच्या यापूर्वीच बैठका घेण्यात आलेल्या आहेत. नोंदणी झालेल्या ४ हजार ४१९ मंडळांमार्फत गणेशाची स्थापना होणार आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क ठेवण्यात येत आहे. गणेश मुर्तीच्या खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता, अशा भागातील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. विसर्जन घाटांची पाहणी पूर्ण झाली असून खास उत्सवासाठी ११३ नवीन सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आल्याचे शुक्ला यांनी सांगितले. शहराच्या विविध भागांमध्ये एकूण तेरा रुग्णवाहिका आणि फरासखाना, तसेच पुरम चौकामध्ये छोट्या रुग्णालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. उत्सवादरम्यान कोणताही विशेष ‘अलर्ट’ आलेला नाही. महत्त्वाच्या गणपतींच्या मंडपांभोवतीही यंदा विशेष बंदोबस्त लावण्यात येणार आहे. दर्शन रांगेला बॅरीगेटींग आणि मेटल डिटेक्टर लावण्यात येणार आहेत. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी एकूण ६२९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. आणखीही काही जणांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. शेवटचे पाच दिवस जरी स्पीकरला रात्री बारापर्यंत परवानगी असली, तरीदेखील आवाजाची मर्यादा (डेसीबल) मात्र बंधनकारक आहे. पोलिसांकडे पुरेसे नॉइल लेवल मीटर आहेत. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करावे असे शुक्ला म्हणाल्या. विविध पथके तैनात गणेशोत्सवादरम्यान पुण्यात १४६ डेसिबलच्यावर आवाज करणाऱ्या फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे.उत्सवादरम्यान बंदोबस्तासाठी दोन अतिरीक्त आयुक्त, १६ उपायुक्त, ४० सहायक आयुक्त, १७० पोलीस निरीक्षक, ६०० सहायक निरीक्षक / उपनिरीक्षक, ८ हजार पोलीस कर्मचारी यांच्यासह बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या टीम्स तैनात करण्यात आल्या आहेत.मार्गदर्शक सूचनागणेश मंडळांनी धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करावी.हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट यांच्या आदेशाचे पालन करावे. प्रत्येक मंडळाने चोवीस तास कमीत कमी दहा स्वयंसेवक नेमावेत. मंडळाच्या समोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे. मंडळासमोर वाजविण्यासाठी ढोल-ताशा पथकाला परवानगी घेणे आवश्यक.पथकांनी नेमून दिलेल्या संख्येपेक्षा जास्त ढोलताशे वापरू नयेत. नागरिकांसाठी सूचनागर्दीमध्ये येताना मौल्यवान वस्तू घालून येणे टाळावे. लहान मुलांची काळजी घ्यावी. बेवारस वस्तू आढळून आल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे.चेंगराचेंगरी होईल, असे वर्तन करूनये.महत्त्वाच्या गणपतींच्या प्रतिष्ठापना मिरवणुकीमध्ये अडथळा निर्माण होऊ नये; तसेच पुढची आणि मागची वाहतूक सुरळीत चालावी, याकरिता यंदा ‘जीपीएस’ सिस्टीमचा वापर केला जाणार आहे. गणेशाच्या रथाला जीपीएस डिव्हाइस जोडले जाणार आहे. त्याचे मॉनिटरिंग पोलिसांमार्फत केले जाणार आहे. त्यामुळे मिरवणुकीचे नेमके ‘लोकेशन’ पोलिसांना समजणार आहे. दोन मिरवणुका एकमेकांना आडव्या येणार नाहीत; तसेच गर्दीमुळे अडथळा होणार नाही, याचीही दक्षता या जीपीएसमुळे घेणे सोपे जाणार आहे. पुण्यामध्ये पहिल्यांदाच हा प्रयोग राबविण्यात येत असून, मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. - सुधीर हिरेमठ, उपायुक्त, परिमंडल एक