शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

दहा शिकाऱ्यांना अटक

By admin | Updated: December 10, 2015 01:31 IST

भीमाशंकर अभयारण्यातील यळवली गावाच्या जवळ जंगली प्राण्यांची शिकार करताना १० शिकाऱ्यांना वन्यजीव विभागाने पकडले आहे.

भीमाशंकर : भीमाशंकर अभयारण्यातील यळवली गावाच्या जवळ जंगली प्राण्यांची शिकार करताना १० शिकाऱ्यांना वन्यजीव विभागाने पकडले आहे. त्यांच्याकडून दोन बंदुका, मारलेला ससा, जळलेल्या अवस्थेतील प्राणी मिळून आले. वनक्षेत्रपाल तुषार ढमढेरे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सापळा लावून दि. ८ रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही कारवाई केली. कोकणातून काही शिकारी शिकार करण्यासाठी अभयारण्यात आल्याची बातमी त्यांना मिळाली होती. त्यांनी सर्व वनरक्षकांना जंगलात फिरवून शिकाऱ्यांचा ठिकाणा शोधून काढला. खेड तालुक्यातील यळवली गावाच्या हद्दीत आंबेनळीच्या जवळ शिकारी रात्री मुक्कामी असल्याचे वनरक्षक बी. टी. खरात यांना आढळून आले. रात्री पकडण्यापेक्षा पहाटे शिकाऱ्यांना पकडण्याचे नियोजन तुषार ढमढेरे यांनी केले व रात्रीपासूनच त्यांच्यावर नजर ठेवली.ढमढेरे यांच्यासह वनमजूर डी. आर. सुपे, वनपाल पी. पी. लांघी असे सुमारे १२ वनकर्मचाऱ्यांच्या टीमने दि. ८ रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास सापळा रचून शिकाऱ्यांवर धाड टाकली. सर्वप्रथम बंदुका ताब्यात घेऊन आरोपींना पकडले. यांतील काही आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, योग्य प्रकारे सापळा लावलेला असल्यामुळे सर्व आरोपी पकडण्यात यश आले. कारवाईच्या ठिकाणी शिकाऱ्यांकडून ठासणीची बंदूक, हत्यारे, मारलेला ससा व जळालेल्या अवस्थेतील प्राणी मिळून आला. हा प्राणी मुुंगूस किंवा उदमांजर असल्याचा अंदाज वनकर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या आरोपींमध्ये गुरुनाथ तातू वारे, मोहन वसंत वारे, गणेश जैतू उघडे, बळीराम जाणू दरवडा, रवी शंकर पादीर, चिंतामण रामा उघडे, मंगेश गोटीराम हिंदोळ, भरत भगवान मांगे, केतन वसंत वारे व माधव गोविंद उघडे या १० जणांचा समावेश असून, सर्व आरोपी धोत्रेवाडी (ता. कर्जत, जि. रायगड) येथील आहेत. या सर्व आरोपींना सहायक मुख्य संरक्षक कीर्ती जमदाडे-कोकाटे व तुषार ढमढेरे यांनी राजगुरुनगर येथे न्यायालयात हजर केले असता, दि. १४ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. या आरोपींवर वन्यजीव संरक्षक अधिनियम १९७२ नुसार विनापरवाना अभयारण्यात प्रवेश करणे, विनापरवाना अभयारण्यात शस्त्र बाळगणे, अभयारण्यात वस्तू पेटविणे, अभयारण्यात शिकार करणे अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक मुख्य संरक्षक कीर्ती जमदाडे-कोकाटे पुढील तपास करीत आहेत. शिकार करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी वन्यजीव अधिनियमानुसार शिक्षा होऊ शकते. भीमाशंकरचे जंगल हे जैवविविधतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठिकाण असून, सगळ्यांकडून त्याचे संरक्षण झाले पाहिजे. भीमाशंकरच्या जंगलात आठ वनसंरक्षण समितीच्या मार्फत काम सुरू आहे़ स्थानिकही जंगलाबाबत जागरूक होत आहेत.(वार्ताहर)