श्रावणाच्या पहिल्या सोमवारी शंकराच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. मंदिराबाहेर महिला व ज्येष्ठांच्या रांगा लागल्या होत्या. पिंपरीतील तपोवन मंदिर, चिंचवडगावातील धनेश्वर मंदिर, कासारवाडीतील शंकर मंदिर, पिंपळे सौदागर येथील शंकर मंदिर, रहाटणीतील शंकर मंदिर, शाहूनगर आदी परिसरात मंदिरे गर्दीने गजबजून गेली होती. मंदिराबाहेर बेल व पान-फु ल विक्रेत्यांनी गर्दी केली होती. मंदिरात पूजेचे ताट ६० रुपयेप्रमाणे विक्री सुरू होती. काही भाविकांनी दुधाचा अभिषेक केला. सर्व मंदिरात ‘ॐ नम: शिवाय’चा जप सुरू होता. क ाही मंदिरांत शिवलीलामृत पारायण सुरू होते. श्रावण महिन्यानिमित्त बहुतांशी मंडळांनी भाविकांसाठी फराळाच्या पदार्थांची सोय केली होती. अभिषेक करण्यासाठी सकाळपासूनच मंदिरांमध्ये गर्दी दिसत होती. अनेक मंदिरांमध्ये हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये कीर्तन, प्रवचन, भजन यांचा समावेश आहे. त्यामुळे परिसरातील वातावरण भक्तिमय झाले असून, भाविक भक्तिरसात चिंब होत आहेत. अनेक मंडळांनी समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा समावेश आहे. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अनेक इच्छुकांनी मंदिरासमोर फलक उभारुन ब्रँडिंग केल्याचे दिसते.किवळे : पुणे - मुंबई महामार्गानजीक शेलारवाडी येथील श्रीक्षेत्र घोरवडेश्वर डोंगरावरील शिवलिंगाचे दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांनी रांग लावून दर्शनाचा लाभ घेतला. त्यामुळे एसटी बसला मोठ्या प्रमाणात गर्दी होती. देहूरोड, किवळे व रावेत परिसरातील महादेवाच्या मंदिरात पहाटेपासून महाअभिषेक, पूजा, आरती व विविध धार्मिक विधी झाले. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. हर हर महादेव, ओम नम: शिवाय, हर हर भोले नम: शिवाय या जयघोषाने डोंगर परिसर दुमदुमून गेला होता. मावळ तालुक्यातील इतर गावातील मंदिरातही मोठ्या प्रमाणात गर्दी होती.
श्रावणी सोमवारनिमित्त मंदिरे फुलली
By admin | Updated: August 18, 2015 03:39 IST