शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरांना मिळणार आता नवी ओळख

By admin | Updated: November 21, 2014 03:56 IST

खुन्या मुरलीधर, भिकारदास मारुती, उंबऱ्या गणपती, उपाशी विठोबा, पानमोड्या म्हसोबा, डुल्या मारुती, चिमण्या गणपती, काळा दत्त, पोटशूळ्या मारुती,

दीपक जाधव, पुणेखुन्या मुरलीधर, भिकारदास मारुती, उंबऱ्या गणपती, उपाशी विठोबा, पानमोड्या म्हसोबा, डुल्या मारुती, चिमण्या गणपती, काळा दत्त, पोटशूळ्या मारुती, उंटाड्या मारुती, पत्र्या मारुती, बंदिवान मारुती, गुंडाचा गणपती..! ही मंदिरांची नावे ऐकून नव्याने पुण्यात आलेल्या व्यक्तीला आश्चर्याचा धक्का बसतो. राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातील मंदिरांची ही नावे बदलण्यासाठी धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाने पुढाकार घेतला असून, त्या दिशेने पावले टाकली जात आहेत.धार्मिक व सार्वजनिक संस्थांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाची आहे. पुणे विभागाचे धर्मादायक सहआयुक्त शिवकुमार डिगे यांच्यासमोर मंदिरांच्या विचित्र नावांचा विषय वकिलांनी नुकताच मांडला. यावर अशा मंदिरांच्या नावाची यादी तयार करण्याच्या सूचना डिगे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार संबंधित मंदिराच्या विश्वस्तांची बैठक घेऊन ही नावे बदलण्याविषयी चर्चा करण्यात येईल. पुणेकरांचा तिरकस स्वभाव व येथील पाट्या देशभर प्रसिद्ध आहेत. या तिरकसपणापासून देवदेवताही वाचू शकलेल्या नाहीत. अनेक मंदिरांना वेगवेगळ्या कारणांमुळे चित्रविचित्र नावे मिळालेली आहेत.पुण्यातील असंख्य मंदिरांची ही नावे तेथील पत्ते ओळखण्यासाठी लँडमार्क म्हणून वापरली जातात. त्यामुळे त्या-त्या भागात ती चांगलीच प्रसिद्ध आहेत. भिकारदास सावकारांच्या नावावरून भिकारदास मारुती हे नाव पडले. उपवास करणारे भाविक दर्शनाला जात असल्याने उपाशी विठोबा हे नाव मिळाले. भांग पिणाऱ्यांचे आश्रयस्थान असलेल्या मंदिराचे नाव भांग्या मारुती असे झाले. पानिपतच्या युद्धात मराठ्यांच्या पराभवाच्या बातम्या पोहोचल्यानंतर गणेश पेठेतील मारुतीची मूर्ती हलू लागल्यामुळे या मारुतीला डुल्या मारुती असे नाव पडल्याचे सांगितले जाते. शनिवारवाड्याजवळ बटाट्याची बाजारपेठ होती त्यावरून बटाटा मारुती नाव पडले.