शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वीरच्या मंदिरातही महिलांना वर्षभर प्रवेश

By admin | Updated: April 11, 2016 00:43 IST

शनिशिंगणापूर देवस्थानने महिलांना गाभाऱ्यात जाऊन अभिषेक करण्यास परवानगी दिल्यानंतर पुरंदर तााुक्यातील वीर येथील माता जोगेश्वरी व श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरांतील गाभाऱ्यातही महिलांना वर्षभर प्रवेश मिळणार

परिंचे : शनिशिंगणापूर देवस्थानने महिलांना गाभाऱ्यात जाऊन अभिषेक करण्यास परवानगी दिल्यानंतर पुरंदर तााुक्यातील वीर येथील माता जोगेश्वरी व श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरांतील गाभाऱ्यातही महिलांना वर्षभर प्रवेश मिळणार आहे. यापूर्वी फक्त यात्रा व नवरात्रोत्सवातच महिलांना प्रवेश मिळत असे.गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या ग्रामसभेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांनी समानतेची गुढी उभारली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी दरवर्षी येथील चावडीवर थिटेबंधू पंचांगवाचन करतात. तसेच गावाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. देवस्थान ट्रस्टच्या वतीने यात्रेदरम्यानचा व संपूर्ण वर्षभराचा जमाखर्चाचा अहवाल या वेळी वाचून दाखवला जातो. देवस्थान ट्रस्टने यात्रेपूर्वीच मंदिरामध्ये महिलांना प्रवेश देण्याचा ठराव देवाचे मानकरी राऊत, शिंगाडे, बुरूंगले, तरडे, व्हटकर, ढवाण, जमदाडे यांच्या संमतीने केला होता. गुढीपाडव्याच्या ग्रामसभेमध्ये महिलांना वर्षभर मंदिर प्रवेशाचा ठराव देवस्थानचे माजी अध्यक्ष रामभाऊ धुमाळ यांनी मांडला. ठरावाला सर्व ग्रामस्थ, देवस्थान, विश्वस्त, मानकरी या सर्वांची मान्यता घेण्यात आली, असे देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब धुमाळ यांनी सांगितले.यापूर्वी यात्रा व नवरात्रीच्या काळामध्ये महिला श्रीनाथ म्हस्कोबा व जोगेश्वरीच दर्शन गाभाऱ्यात जाऊन घेत असत. यात्रेतही, देवांच्या लग्नात हळद लावण्याचा मान महिलांना होता. आता वर्षभर गाभाऱ्यात प्रवेश मिळणार आहे.या वेळी देवस्थानचे सचिव तय्यद मुलाणी यांचा कौमी एकता पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक विलास धुमाळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ग्रामसभेला देवाचे मानकरी तात्या बुरुंगले, पंचायत समिती सदस्य दिलीप धुमाळ, उपसरपंच प्रताप धुमाळ, उपाध्यक्ष संभाजी धुमाळ, विश्वस्त बबन धसाडे, ज्ञानेश्वर धुमाळ, नामदेव जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)