शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकी गायकीतून भक्तीचा मळा

By admin | Updated: June 10, 2017 02:13 IST

शास्त्रीय गायकीची बैठक, सुरेल गळा आणि त्याला तितकाच साजेसा ठेका यातून पुण्यातील गल्ल्यांतून कर्नाटकी गायकी भक्तीचा मळा फुलवित आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शास्त्रीय गायकीची बैठक, सुरेल गळा आणि त्याला तितकाच साजेसा ठेका यातून पुण्यातील गल्ल्यांतून कर्नाटकी गायकी भक्तीचा मळा फुलवित आहे. तयारीच्या गायकालाही अचंबित करेल अशी कला असूनही पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना दारोदार फिरावे लागत आहे. मात्र, घराण्याची परंपरा असल्याने कोणाकडे काही मागायचे नाही, देवाची भजने गाऊन लोकांनी झोळीत काही टाकले तरच घेऊन पुढे निघायचे असा त्यांचा शिरस्ता आहे. लोककलाकारांच्या अंगभूत कलेचा जिवंत नमुना म्हणजे परशुराम महंत आणि त्यांचा सहकारी महेश कल्लाप्पा महंत. हे दोघे कोणी मोठे गायक वा तबलजी नाहीत. पुण्यातील कात्रजच्या एका वस्तीमध्ये राहणारे लोककलावंत आहेत. हे दोघेही मूळचे कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील देवीहाळ तालुक्यामधील रहिवासी आहेत. शिरहाटी नावाच्या एका छोट्याशा खेड्यामधून ते पत्नी व भावासह पंधरा वर्षांपूर्वी पुण्यामध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी आले. कर्नाटकातील प्रसिद्ध संत पुरंदर यांचे ते अनुयायी आहेत. त्यांच्या कुटुंबाचा भजन गाणे हा पारंपरिक व्यवसाय आहे. परशुराम यांच्या मागील कित्येक पिढ्या भजन गातच लहानाच्या मोठ्या झाल्या. कुटुंबाच्या परंपरेने कला दिली, मात्र सुबत्ता दिली नाही. त्यामुळे पोटासाठी पुण्याचा रस्ता धरलेल्या या दोघांनी कला लोकांना दाखवून उपजीविका करण्याचा निर्णय घेतला.