शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

सांगा आम्ही आता जगायचं तरी कसं?

By admin | Updated: November 30, 2015 01:47 IST

‘सांगा आम्ही कसं जगायचं?...’ या कवी मंगेश पाडगांवकर यांच्या कवितेतील प्रश्नाप्रमाणे मावळातील कातकरी आदिवासी समाजाचे जगणे झाले आहे

वडगाव मावळ : ‘सांगा आम्ही कसं जगायचं?...’ या कवी मंगेश पाडगांवकर यांच्या कवितेतील प्रश्नाप्रमाणे मावळातील कातकरी आदिवासी समाजाचे जगणे झाले आहे. महागाई, टंचाई व भाववाढीने साधं माणसासारखं जगणंही अशक्य व्हावं, अशी गोरगरीब आदिवासी कातकरी समाजाची स्थिती झाली आहे. मावळ तालुक्यात मोठ्या संख्येने असलेल्या या समाजाचे सर्व प्रयास भाकरीसाठीच चाललेले असतात. कारण भुकेची आग शांत करण्यासाठी माणसाला काहीही करावं लागतं. काबाडकष्ट करीत, रानोमाळ भटकत मिळेल ते अन्न खावून जठराग्नी शांत करण्याचा प्रयत्न केला जातो. चैन,सूख त्यांच्यासाठी दुरापास्तच. सध्या कुपोषण ही समस्या कातकरी समाज्यासाठी सर्वात मोठी समस्या बनली आहे. ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’ या म्हणीप्रमाणे आजची परिस्थिती आहे. त्यामुळेच कातकरी समाजात समस्याच समस्या आहेत. शेती, महिलांचे प्रश्न. बालकांचे कुपोषण, बालमृत्यू, बालकामगार, शोषण, शैक्षणिक अडचणी अशा अनेक , समस्या कातकरी समाजाला भेडसावत आहेत. मावळमधील कातकरी महिला आणि कुपोषित बालकांची समस्या अधिकच बिकट आहे. कातकरी पाड्यापर्यंत पोषण आहार योजना पोहोचत नसल्यामुळे कातकरी माता आणि त्यांच्या बालकांचे कुपोषण सुरुच आहे. पाड्यापर्यंत शासकिय वैद्याकिय अधिकारी किंवा सुविधा पोहोचत नाही. ज त्यामुळे त्यांचा आरोग्याचा प्रश्न तर दिवसेंदिवस बिकट बनत आहे. कातकरी महिला आपल्या मुलांवर घरगुतीच उपचार करतात. त्याने जर बालक बरे झाले नाही तर त्यास उपचारासाठी घेवून जातात. आजही मावळमधील कातकरी पाड्यापर्यंत वीज किंवा पाणी आलेले नाही. शिधापत्रिकाही नसल्यामुळे कातकरींना शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. या समाजातील लोकांसाठी काम करण्यासाठी सामाजिक संस्थांही सहसा पुढे येत नाहीत. राजकीय नेते त्यांना फक्त मतदानकार्ड काढून देतात व या समाजाचा वापर मतदानासाठी करतात. निवडणुकीनंतर समाजाला त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. मावळमधील शेकडो कातकरी तरुण शिक्षणाअभावी फिरत आहेत. झोपडीची जमीनही नाही नावेशिक्षणाचा अभाव, अज्ञान,अंधश्रद्धा यामुळे हा समाज पिचला आहे. त्यामुळे अन्न,वस्त्र,निवारा या मूलभूत गरजाही ते व्यवस्थित भागवू शकत नाही. ते राहत असलेल्या झोपडीखालची जमीनदेखील त्यांच्या नावे नसल्यामुळे मूळ मालक त्यांना त्रास देतात. त्यांच्याकडे पिवळे रेशनिंग कार्ड असूनही त्यांना धान्य मिळत नाही. त्यामुळे या अदिवासी लोकांच्या उपजीविकेसाठी शासनाने त्यांना धरणामध्ये मासेमारीची परवानगी द्यावी.- बंडू ठाकर, सह्याद्री आदिवासी विकास संघटना, जिल्हाध्यक्ष