शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

जेजुरी परिसरात दूरध्वनीसेवा ठप्प

By admin | Updated: December 30, 2014 22:49 IST

जेजुरी नगरपालिका आणि बीएसएनएल यांच्या भोंगळ कारभारामुळे शहरातील दूरध्वनीसेवा खंडित झालेली असून, ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

जेजुरी : जेजुरी नगरपालिका आणि बीएसएनएल यांच्या भोंगळ कारभारामुळे शहरातील दूरध्वनीसेवा खंडित झालेली असून, ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वारंवार तक्रारी-विनंत्या करूनही सेवा सुरळीत होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. जेजुरी शहरात नगरपालिकेतर्फे गेल्या सहा महिन्यांपासून रस्तेदुरूस्ती, तसेच गटारे बांधकामाची कामे सुरू आहेत. जेसीबी यंत्राच्या साहाय्याने रस्ते खोदण्यात येत असल्याने भूमिगत दूरध्वनीच्या केबल तुटल्या आहेत. जमिनीखालून, तसेच गटारातून बीएसएनएलच्या केबल गेलेल्या असल्याने दररोज विविध भागांतील टेलिफोन व इंटरनेट सेवा खंडित होत आहेत. यामुळे सुविधा असूनही उपयोग होत नाही. वारंवार केबल तुटल्याने महिन्यातून १० ते १५ दिवस सेवा बंदच राहते. तरीही बिले भरावीच लागत असल्याने ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. खंडोबा मंदिर पायथ्यालगतच्या ग्राहकांनी या त्रासाला कंटाळून इतर सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे. बीएसएनएल नको रे बाबा, अशीच प्रतिक्रिया शहरातून उमटत आहे. गेल्या तीन दिवसांपासून केबल तुटण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. यामुळे ग्राहकांत प्रचंड संताप व्यक्त होत आहे. बीएसएनएलकडे तक्रार केली असता, केबल तुटली आहे, केबल शोधत आहोत, अशीच उत्तरे मिळत आहेत. पालिकेचे काम सुरू असल्याने केबल तुटत आहेत. ते परस्परच काम करतात, यामुळे केबल तुटल्याचे आम्हाला समजत नाही. तेथील काम पूर्ण झाल्याशिवाय दुरुस्ती ही शक्य नाही, अशी कारणे ग्राहकांना दिली जात आहेत. पालिकेकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास याची जबाबदारी बीएसएनएलची आहे, असेच उत्तर देण्यात येत आहे.ग्राहक मंचाकडे करणार तक्रार४ ठेकेदाराकडून केबल तुटल्या जातात. त्यांना सूचना देण्यासाठी जेजुरी पालिकेतील या विभागाच्या अभियंत्याची बदली झाल्याने दखल घ्यायलाही कोणीच नाही. पत्र वा अर्ज दिल्यास त्याला केराची टोपली दाखवली जात आहे. यामुळे ग्राहकांनी जेजुरी नगरपालिका आणि बीएसएनएल कडून झालेल्या मनस्तापाबाबत, तसेच दूरध्वनी सेवा खंडित असतानाही वसूल केलेल्या बिलाबाबत नुकसानभरपाई मिळवण्यासाठी ग्राहक मंचाकडे तक्रार घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे.