शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राज्याकडून पुण्याला ‘तेजस्विनी’

By admin | Updated: March 19, 2016 02:50 IST

मोठ्या शहरांमध्ये नोकरी तसेच इतर निमित्ताने मोठ्या प्रमाणात बसप्रवास करणाऱ्या महिलांसाठी स्वतंत्र तेजस्विनी बस देण्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी २0१६-१७ च्या

पुणे : मोठ्या शहरांमध्ये नोकरी तसेच इतर निमित्ताने मोठ्या प्रमाणात बसप्रवास करणाऱ्या महिलांसाठी स्वतंत्र तेजस्विनी बस देण्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी २0१६-१७ च्या राज्याच्या अंदाजपत्रकात केली आहे. पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नागपूर या शहरांमध्ये या बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे बसची संख्या कमी असल्याने गर्दीत अनेक समस्यांना तोंड देत प्रवास करणाऱ्या महिलांना या योजनेमुळे काही प्रमाणात का होईना दिलासा मिळण्यास मदत होणार असल्याने या घोषणेचे महिला प्रवाशांकडून स्वागत करण्यात आले आहे. प्रामुख्याने नोकरी तसेच शिक्षणासाठी बसप्रवास करणाऱ्या महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. महिला प्रवाशांना दिलासा देण्यासाठी २0१६-१७ च्या अंदाजपत्रकात महिलांना बसप्रवास सुखकर होण्यासाठी स्थानिक प्राधिकरणामार्फत ३00 बस उपलब्ध करणार असल्याची घोषणा केली आहे. यासाठी तब्बल ५0 कोटी रुपयांची तरतूदही प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे या पाच शहरांना समान बस दिल्यास पुणे शहरास महिलांसाठी तब्बल ६0 बस उपलब्ध होणार आहे.अनेकदा गर्दीमुळे बसमध्ये मोठी कुचंबणा होते. अनेकदा गर्दीच्या वेळी मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की केली जाते, तर कधी कधी चोऱ्यांचादेखील सामना करावा लागतो. महिलांसाठी स्वतंत्र बस उपलब्ध झाल्यास नोकरदार महिलांची चांगली सोय होणार आहे. भविष्यातही बसची संख्या आणखी वाढविणे गरजेचे आहे. -नीता भंडवलकर (बस प्रवासी)बसमध्ये महिलांसाठी आरक्षणाची जागा असूनही त्यावर जागा मिळत नाही. त्यामुळे महिलांसाठी गर्दीच्या वेळी स्वतंत्र बस असणे आवश्यक आहे. या निर्णयामुळे नवीन बस मिळणार असल्याने त्याचा महिलांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.- निशा शिंदे (बस प्रवासी)