शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरच्या तहसीलदारांची मॅटकडे धाव

By admin | Updated: March 28, 2016 03:14 IST

प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकाऱ्यांना नियमित तहसीलदार पदावर नियुक्ती करण्याकरिता इंदापूरच्या तहसीलदारांची अवघ्या दहा महिन्यांत बदली करण्यात आली. जिल्हाधिकारी

इंदापूर : प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकाऱ्यांना नियमित तहसीलदार पदावर नियुक्ती करण्याकरिता इंदापूरच्या तहसीलदारांची अवघ्या दहा महिन्यांत बदली करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या निणर्याच्या विरोधात इंदापूरच्या तहसीलदारांनी मॅटकडे धाव घेतली आहे. सोमवारी त्याबाबत हालचाल होण्याची शक्यता आहे. दहा महिन्यांपूर्वी सूर्यकांत येवले यांची इंदापूरचे तहसीलदार म्हणून नेमणूक झाली. आल्यापासून अवैध वाळू वाहतूक,बेकायदेशीर खडी क्रशर आदी व्यवसायांवर त्यांनी कारवाई करण्याचा धडाका लावला. लुमेवाडी येथील अवैध प्रवासी वाळूसाठ्यावर कधी ही कारवाई झाली नव्हती. ती त्यांनी करून दाखवली होती. शासनाच्या महसुली उत्पन्नात भरीव भर टाकणाऱ्या येवले यांच्या वाहनाला वाळू वाहतूकदारांनी धडक देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंदळकर यांच्या नेतृत्वाखाली वाहतूकदारांच्या संघटनेने पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या बाह्यवळण रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करताना, येवले यांना लक्ष्य केले. तहसील कार्यालयात हंगामा केला. त्या वेळी येवले प्रकाशात आले. त्यानंतर त्यांच्या शासकीय वाहनचालकाचा संशयास्पद अपघात झाला. या घटनेनंतर काही दिवस उलटून गेल्यानंतर, दि.१९ मार्च रोजी त्यांची तडकाफडकी बदली झाली. एकत्रित परिविक्षाधिन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत परिविक्षाधिन उपजिल्हाधिकारी वर्षा लांडगे यांना दि.२१मार्च ते २१ आॅगस्ट या २२ आठवड्यांच्या प्रशिक्षण कालावधीत नियमित तहसीलदार या पदावर नियुक्ती करण्यासाठी, येवले यांची रीतसर उचलबांगडी करण्यात आली. आपले कामकाज चांगले असताना, महसुली उत्पन्नात वाजवी भर टाकण्यातदेखील कसलीही कुचराई झाली नसताना का बदली करण्यात आली, असा सवाल उपस्थित करून बदलीस स्थगिती मिळावी, यासाठी येवले यांनी मॅटकडे धाव घेतली आहे. सोमवारी त्याबाबत हालचाल होण्याची शक्यता आहे.