शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

महिलेकडून युवकाचा खून

By admin | Updated: January 12, 2017 02:09 IST

पुणे-सातारा महामार्गावरील किकवी येथे अनैतिक संबंधांतून महिलेने युवकाचा खून केल्याची घटना काल रात्री उघडकीस आली.

नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावरील किकवी येथे अनैतिक संबंधांतून महिलेने युवकाचा खून केल्याची घटना काल रात्री उघडकीस आली. यात सचिन बापूराव जाधव (वय २९, रा. वाठार स्टेशन, कोरेगाव, सातारा, सध्या किकवी) या युवकाचा खून झाला आहे.सचिन जाधव याला त्याच्या राहत्या घरी फिट आल्याची माहिती राणी श्रीपती मंडोत हिने भोंगवली आरोग्य केंद्रातील डॉ. मंदार सुरेश माळी यांना सोमवारी (दि. ९) रात्रीच फोनवरून सांगितली होती. त्यामुळे डॉ. माळी सचिन याला तपासण्यास किकवी येथे आले होते. त्या वेळी या युवकाला फिट आलेली नसून त्याचा गळा दाबल्याचे व त्याच्या डोक्याला इजा झाल्याचे तपासताना समजून आले. त्या वेळी त्यांनी सचिनचा संशयास्पद मृत्यू असल्याबाबत किकवी पोलिसांना माहिती दिली. त्याच वेळी सचिनबरोबर चार महिन्यांपासून राहणाऱ्या महिलेला डॉक्टरांनी पोलिसांना झालेल्या प्रकाराची माहिती दिल्याचे समजताच काही तरी कारण काढून घटनास्थळावरून तिने पलायन केले.सचिन जाधव शिरवळ येथील प्रवीण मसाले येथे वाहनचालक म्हणून नोकरीस होता. दरम्यान, पोलिसांनी सचिनच्या नातेवाइकांना याबाबत कळविल्याचे समजते. त्या वेळी त्यांच्याकडून सचिनचे लग्नच झालेले नसल्याची बाब उघडकीस आली. मग त्याच्याबरोबर राहणारी महिला कोण, असाही प्रश्न नातेवाइकांना पडला. याच काळात घटनास्थळाला उपविभागीय अधिकारी डॉ. वैशाली कडूकर यांनी भेट दिली. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्याचे नारायण सारंगकर व पोलीस कर्मचारी रात्री उशिरापर्यंत या घटनेचे तपास करीत होते.(वार्ताहर)