शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्याही डोळ्यांत तरळले अश्रू

By admin | Updated: October 2, 2016 05:40 IST

काश्मीरमधील उरी येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले लान्स नाईक चंद्रकांत गलांडे यांच्या अस्थींचे श्री क्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदीत विधिवत विसर्जन करण्यात आले.

पिंपरी : काश्मीरमधील उरी येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले लान्स नाईक चंद्रकांत गलांडे यांच्या अस्थींचे श्री क्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदीत विधिवत विसर्जन करण्यात आले. शहीद गलांडे यांचे मूळ गाव माण तालुक्यातील जाशी येथून आणलेला अस्थिकलश कात्रजपासून रॅलीने आळंदीपर्यंत नेण्यात आला. वीरपत्नी निशा गलांडे या साडेतीन वर्षांचा मोठा मुलगा श्रेयस, तसेच नऊ महिन्यांच्या छोट्या जयसह रॅलीत सहभागी झाल्या होत्या. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांना पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रीय सैनिक संस्था, मार्शल कॅडेट फोर्स, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स, इंडिअन एक्स सर्व्हिसेस लीग या संस्थांच्या पुढाकाराने सकाळी साडेसात वाजता कात्रज येथून अस्थिकलश रॅली काढण्यात आली. पिंपरी-चिंचवड येथून आळंदीपर्यंत रॅली नेण्यात आली. २० दुचाकीस्वार रॅलीत सहभागी झाले होते. आळंदी येथे इंद्रायणीत अस्थिविसर्जन करण्यात आले. प्रताप भोसले, महिपाल जांगीड, संदीप भंडारी, डी. एच. कुलकर्णी, डी. एम. कोळी यांनी रॅलीचे आयोजन केले होते.(प्रतिनिधी)वीरपत्नींचा सन्मान भारत-पाक युद्धातील शहीद राम साठे यांच्या वीरपत्नी सुशीला साठे, तसेच नुकतेच उरी येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले लान्स नाईक चंद्रकांत गलांडे यांच्या वीरपत्नी निशा गलांडे यांचा वायू सेनेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पदक प्राप्त झालेले निवृत्त कमांडो सुरेंद्र सिंग त्यागी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.