शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणुकीसाठी संघ दक्ष

By admin | Updated: January 5, 2016 02:28 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्ताकेंद्र मानल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे मुळशी तालुक्यातील मारुंजी येथे शिवशक्ती संगम हा विशेष कार्यक्रम झाला

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्ताकेंद्र मानल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे मुळशी तालुक्यातील मारुंजी येथे शिवशक्ती संगम हा विशेष कार्यक्रम झाला. हे शिबिर २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीची नांदी असून, राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानले जाणारे पिंपरी-चिंचवड काबीज करण्यासाठी ‘संघनीती’चा वापर केल्याची चर्चा आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्थापनेपासून काँग्रेस, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. यापूर्वी हा परिसर बारामती, खेड या दोन लोकसभा मतदारसंघांत समाविष्ट होता. त्यानंतर लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना केल्यानंतर हे शहर शिरूर, मावळ आणि बारामती मतदारसंघात येत आहे. सध्या बारामतीतून राष्ट्रवादी आणि खेड आणि मावळमधून शिवसेनेच्या उमेदवारीवर खासदार निवडून आलेले आहेत. तर भोसरी, पिंपरी, चिंचवड, मुळशी आणि मावळ अशा विधानसभा मतदारसंघांतील भाग पिंपरी-चिंचवड शहरात आहे. मुळशीत काँग्रेस, मावळ आणि चिंचवडमध्ये भाजपा, पिंपरीत शिवसेना आणि भोसरीत अपक्ष असे आमदार निवडून आले आहेत. या भागात संघविचारांच्या लोकांची संख्या अधिक असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकमुखी सत्ता आहे. राष्ट्रवादीतील विद्यमान पदाधिकारी पक्षातील स्थानिक नेत्यांच्या कार्यपद्धतीमुळे नाराज आहेत. त्यामुळे अनेकजण भाजपाच्या वाटेवर आहेत. लक्ष्य बारामतीच! ४५० एकर जागा असल्याने संघाने शिबिरासाठी मारुंजीची निवड केली, असे सांगितले जात असले, तरी हा परिसर बारामती लोकसभा मतदारसंघात आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे संघ शिबिरातून बारामतीच लक्ष असल्याचे दिसून येते. कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पिंपरी-चिंचवड परिसरात पहिल्यांदाच पावणेदोन लाख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य शिबिर झाल्याने या तीनही भागांतील कार्यकर्त्यांत चैतन्य आल्याचे बोलले जात आहे. या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी पूर्वीचा आणि आत्ताचा संघ, संघविचारांविषयी असणारे गैरसमज सांगण्याबरोबरच विविधतेतून एकता हीच देशाच्या प्रगतीसाठी पूरक आहे, सामाजिक समतेसाठी सर्वांनी संघाच्या झेंड्याखाली काम करा, असे आवाहन केले. त्यामुळे शिवशक्तीच्या माध्यमातून भाजपच्या कार्यकर्त्यांची ताकद वाढविण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा शहरात आहे.संघस्थानालगत पिंपरी-चिंचवड महापालिकेची हद्द आहे. वाकड, पुनावळे या गावांलगतचा हा परिसर आहे. या गावांचा १९९७ मध्ये महापालिकेत समावेश झाला; परंतु पुनावळे गाव ते कोयतेवस्ती, पुनावळे गाव ते भूजबळवस्ती, भूमकर चौक ते मारुंजी रस्त्यांची कामे अनेक वर्षांपासून रखडली होती. तसेच हिंजवडी-मारुंजी हा रस्ताही रखडला होता. मात्र, संघ शिबिर असल्याने महिनाभरात या रस्त्यांचे रुंदीकरण, डांबरीकरणाची किमया झाली. रस्त्यांचा खर्च कोणी केला आणि कोणाच्या आदेशानुसार झाला, हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, शिबिराच्या नावाखाली या भागातील नागरिकांना जोडण्याचा विचार असल्याचे दिसून येते.(प्रतिनिधी)> महापौरपद धोक्यातराष्ट्रवादीच्या महापौर शकुंतला धराडे या आमदार लक्ष्मण जगताप यांच्या खंद्या समर्थक मानल्या जातात. जगताप यांनी भाजपात प्रवेश केल्याने महापौरांची गोची झाली आहे. संघ शिबिरास त्यांनी उपस्थिती लावली होती. मात्र, यामुळे वाद उद्भवू शकतो, ही चूक लक्षात आल्याने महापौरांनी कार्यक्रमस्थळावरून पळ काढला. ‘नोकरी एकाची आणि चाकरी दुसऱ्यांची’ अशी टीका होत असताना महापौरांनी शिबिरास लावलेली उपस्थिती वादाच्या भोवऱ्यात आहे.