शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

छेड काढणाऱ्याला धडा शिकवल्याने मुलीवर वार

By admin | Updated: October 21, 2016 04:46 IST

छेड काढल्याने भर चौकात चपलेने मारल्याच्या रागामधून दोन दिवसांनी एकाने मुलीवर कटरने वार केले. मंडई परिसरात एवढा गंभीर गुन्हा घडल्यावरही पोलिसांकडून मात्र गुप्तता

पुणे : छेड काढल्याने भर चौकात चपलेने मारल्याच्या रागामधून दोन दिवसांनी एकाने मुलीवर कटरने वार केले. मंडई परिसरात एवढा गंभीर गुन्हा घडल्यावरही पोलिसांकडून मात्र गुप्तता पाळण्यात आली. माध्यमांना या घटनेची खबरही लागू न देणाऱ्या पोलिसांनी आरोपी ताब्यात येताच वाघ मारल्याचा आव आणत नंतर स्वत:ची पाठ थोपटवून घेतली.पीडित मुलगी गोपाळ हायस्कूलमध्ये शिकते. मैत्रिणीसह ती सकाळी सातच्या सुमारास शाळेमध्ये जात होती. त्या वेळी देवदास भीमाप्पा मरटी या फिरस्त्याने पाठलाग करत त्यांच्याकडे पाहून अश्लील हावभाव केले होते. शिट्ट्या मारत, गाणी म्हणत त्यांची छेड काढली होती. या मुलीने नंतर त्याचा पाठलाग सुरू केला. धैर्याने त्याला महात्मा फुले मंडईमध्ये गाठून चपलेने मार दिला होता. आरोपीने अपमानाचा बदला घेण्यासाठी पीडित मुलीच्या जाण्यायेण्याच्या रस्त्यावर पाळत ठेवली. बुधवारी सकाळी शाळेमध्ये जात असलेल्या मुलीवर पाठीमागून आलेल्या आरोपीने हल्ला केला. तिच्या पोटावर तसेच हातावर वार करून तो पसार झाला होता. विश्रामबाग पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज मिळवून त्यातील आरोपीला शोधून काढले. त्याच्याकडून कटरही जप्त करण्यात आले आहे. परंतु, शाळेमध्ये जात असलेल्या अल्पवयीन मुलीची छेड काढली जाते आणि ही मुलगी धैर्याने या आरोपीला चपलेने मारते. त्याच्या रागामधून तिच्यावर हल्ला करण्यात येतो. राज्यात महिला-मुलींवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढते आहे. पुण्यात गजबजलेल्या परिसरात मुलीवर हल्ल्याचा गंभीर प्रकार घडूनही पोलिसांनी याची माहिती माध्यमांपासून लपवून ठेवली. आरोपी सापडताच याची माहिती जाहीर करून मिरविण्याचा प्रयत्न मात्र केला. (प्रतिनिधी)