शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक दाम्पत्यांची ‘अधुरी कहाणी’ पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 06:44 IST

पाच वर्षांपासून रखडलेली आतंरजिल्हा शिक्षक बदली प्रक्रियामंगळवारी पुणे जिल्हा परिषदेत ती राबविण्यात आली. गेली १० ते १५ वर्षे कुटुंबीयांपासून दूर राहिलेल्या ९५ शिक्षकांना पती-पत्नी एकत्रीकरणातून

पुणे : पाच वर्षांपासून रखडलेली आतंरजिल्हा शिक्षक बदली प्रक्रियामंगळवारी पुणे जिल्हा परिषदेत ती राबविण्यात आली. गेली १० ते १५ वर्षे कुटुंबीयांपासून दूर राहिलेल्या ९५ शिक्षकांना पती-पत्नी एकत्रीकरणातून एकमेकांजवळ येता आले. त्यामुळे गेली अनेक वर्षे ऐकमेकांशिवाय सुरू असलेली संसाराची ‘अधुरी कहाणी ’ खºया अर्थाने पूर्ण झाल्याच्या भावना ‘लोकमत’शी बोलताना काही शिक्षकांनी व्यक्त केल्या. राज्यात सुमारे १२ हजार अशी शिक्षक दाम्पत्ये एकेमेकांपासून दूर राहत आहेत.लग्नानंतर १0 ते १५ वर्षे दूर राहिल्याने अनेक शिक्षकांचे संसार घटस्फोटाच्या वळणावर येऊन थांबला होता. अनेक दाम्पत्यांची भेट महिना महिना होत नव्हती. ना आई बाबांचे दर्शन ना बायका लेकरांची भेट. अशा कौैटुंबिक ताणतणावात जिल्हा परिषदेतील शिक्षक दाम्पत्य शिक्षणसेवेचे काम करीत होते.समान जात संवर्गाच्या जाचक अटीमुळे अनेक वर्षांपासून ते कटुंबापासून दूर राहत होती. गेली ५ वर्षे आंतरजिल्हा बदली प्रक़्रिया राबवली न गेल्यामुळे त्यांना स्वजिल्ह्यात येता येत नव्हते. अखेर ही प्रक्रिया सुरू झाली आहे. आज जिल्हा परिषदेत ३१९ शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीतून स्वजिल्ह्यात शाळा देण्यात आली असून यात ९५ शिक्षक हे पती पत्नी एकत्रीकरणातून आले आहेत. यात पती किंवा पत्नी हे दुसºया जिल्ह्यात नोकरी करीत होते. यातील तीन शिक्षक दाम्पत्य दोघेही बाहेरून आले आहेत.यावेळी विजय घोळवे या शिक्षकाशी संपर्क साधला असता, मी १७ वर्षे सातारा जिल्ह्यात नोकरी करीत असून माझे कुटुंब हे बारामतीत राहते. अनेक अडअडणीच्या वेळी माझी गरज असतानाही मी त्यांच्याबरोबर नव्हतो. आता मी कुटुंबियांजवळ आल्याने आतापर्यंत माझी राहिलेली उणीव भरून काढणार आहे. विजय यांच्या पत्नी जयश्री यांच्याशी म्हणाल्या, १३ वर्षे आमच्या लग्नाला झाली पण एकमेकांना आमचा तसा काही उपयोग होत नव्हता. आता झालं एकदाचं...आंम्ही अखेर आता खºया अर्थाने एकत्र येणार असल्याचा आनंद मोठा आहे.शिक्षक भीमदेव जाधव यांनी मला खूप आनंद झाला. जिल्ह्यात बदली करून घेण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र काही उपयोग झाला नाही. मात्र शासनाने ही आॅनलाईन प्रक्रिया राबविली असल्यामुळे कोणत्याही वशील्याविना, पारदर्शकपणे कटुंबाजवळ येता आले. आता घरी सुखासमानधानाने राहता येईल. त्यांच्या पत्नी स्वाती जाधव यांनी तर आजचा दिवस हा मोलाचा ठरला अशी भावना व्यक्त केली. खूप दिवसांची प्रतिक्षा संपली, असे सांगत ८0 टक्के लोकांची यामुळे सोय झाली आहे. यामुळे नव्याने चांगले वातावरण निर्माण होवून आंम्ही हे पती पत्नी चांगली शिक्षणसेवा देतील. आमच्यापेक्षाही काही जणांचे खूपच वाईट परिस्थिती होती. त्यांना जवळ येता आले.जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये शिक्षकांच्या ८५३ जागा रिक्त आहेत. ६०६ जागा पहिल्या टप्प्यात भरण्यात येणार आहेत; परंतु ३ टक्के या जागा रिक्त ठेवण्यात येणार आहेत. त्यांपैकी ५१२ जागा भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यात आंतरजिल्हा बदलीतून ४१९ शिक्षक उपलब्ध झाले आहेत. त्यांची सेवाज्येष्ठतेनुसार आॅनलाईन (समुपदेशन) भरती जिल्हा परिषदेच्या शरद पवार सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्थितीत राबविण्यात आली. आज ३१९ जागा आदीवासी, अवघड व सोप्या अशा तीन क्षेत्रात या बदल्या करण्यात आल्या. यात बारामती, इंदापूर, पुरंदर, आंबेगाव या तालुक्यांतील जागांना शिक्षकांनी पसंती दिली. येथील दाखविलेल्या सर्वच रिक्त जागा आज भरल्या गेल्या.