शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकही संतापला!, सासवडच्या सभेत राज्यव्यापी आंदोलनाचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:20 IST

बारामती : नवीन बदलीधोरणाच्या विरोधात शिक्षकांचा असंतोष शिगेला पोहोचला आहे. सोमवारी (दि. २३) जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाची सासवड येथे सभा पार पडली. या सभेत राज्यव्यापी आंदोलनाचा ठराव करण्यात आला.

बारामती : नवीन बदलीधोरणाच्या विरोधात शिक्षकांचा असंतोष शिगेला पोहोचला आहे. सोमवारी (दि. २३) जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाची सासवड येथे सभा पार पडली. या सभेत राज्यव्यापी आंदोलनाचा ठराव करण्यात आला. त्यामुळे अंगणवाडी, एसटी कर्मचाºयांपाठोपाठ आता शाळा सुरू होण्यापूर्वीच राज्यभर शिक्षक आंदोलनाचा भडका उडणार आहे.नवीन बदलीधोरणाच्या अंमलबजावणीसाठी मागील सहा महिन्यांपासून ग्रामविकास विभाग अडून बसल्याने शिक्षक बदल्यांचा वाद चिघळला आहे. २७ फेब्रुवारीच्या शासन निर्णयामुळे बहुतांश शिक्षकांना विस्थापित व्हावे लागत असल्याने मोठ्या प्रमाणावर गैरसोयीच्या बदल्यांची भीती आहे.बदलीधोरणाबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाची सभा सासवड येथील शिक्षक संघाच्या शंकरराव ऊरसळ सभागृहात झाली. या वेळी जिल्हाभरातून सर्व तालुका संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.शासनाच्या बदली पोर्टलविषयी मोठ्या प्रमाणात संघटनेकडे तक्रारी नोंदविण्यात आल्या. पारदर्शी कारभाराच्या नावाखाली राबविण्यात येत असलेल्या आॅनलाईन प्रक्रियेविषयी अनेक शिक्षकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. अनेक बदलीपात्र नसलेल्याही शिक्षकांची नावे प्रशासकीय बदलीसाठीदिसत आहेत.बदली फॉर्म आॅनलाईन भरताना सर्व्हर डाऊन असणे, स्टाफ पोर्टलवरील ट्रान्सफर टॅब ओपन नसणे या मुळे शिक्षक त्रस्त आहेत. रात्रंदिवस साईट ‘ओपन’ होण्याची वाट बघण्याची वेळ शिक्षकांवरआली आहे. जिल्हा संघाच्या सभेत बहुतांश तालुकाध्यक्षांनी तीव्र आंदोलनाची मागणी केली असल्याने राज्यव्यापी आंदोलनाचा ठराव करण्यात आला.शासन गैरसोयीच्या बदल्यांसाठी विनाकारण अडून राहिले आहे. शिक्षकांचा आत्मसन्मान दुखावल्याने राज्यभर शिक्षक आंदोलनाचा वणवा पेटणार आहे, असे शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी सांगितले.>राज्यव्यापी आंदोलनाची अंतिम रूपरेषा ठरविण्यासाठी पुणे येथील शिक्षक संघाच्या शरद अध्यापक विद्यालयात आज(दि. २५) बैठक होत आहे. संभाजीराव थोरात, बाळकृष्ण तांबारे यांच्यासह राज्यभरातील अन्य प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात येणार आहे.यानिमित्त सर्व संघटनांना एकत्र आणण्याविषयी चर्चा करण्यात येणार आहे.