शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मिळकत कर, पाणीपट्टी वाढीस एनजीओंचा विरोध

By admin | Updated: December 24, 2015 00:53 IST

महापालिका प्रशासनाने पाणीपट्टीमध्ये दुपटीने तर मिळकत करामध्ये १० टक्के वाढ करण्याच्या ठेवलेल्या प्रस्तावाला स्वयंसेवी संस्थांकडून जोरदार विरोध दर्शविण्यात आला आहे.

पुणे : महापालिका प्रशासनाने पाणीपट्टीमध्ये दुपटीने तर मिळकत करामध्ये १० टक्के वाढ करण्याच्या ठेवलेल्या प्रस्तावाला स्वयंसेवी संस्थांकडून जोरदार विरोध दर्शविण्यात आला आहे. करवाढ करून सर्वसामान्यांवर करवाढीचा बोजा टाकण्याऐवजी उत्पन्नाचे पर्यायी मार्ग शोधण्याची मागणी करण्यात आली आहे.स्थायी समितीसमोर पाणीपट्टी व मिळकत करामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये हा विषय ठेवला जाणार आहे. प्रशासनाच्या या प्रस्तावाला सजग नागरिक मंच, सुराज्य संघर्ष समिती, हमारी अपनी पार्टी या स्वयंसेवी संस्थांकडून विरोध दर्शविण्यात आला आहे. महापालिका पुणेकरांना वर्षभर एक दिवसआड एक वेळ पाणी देणार आहे. त्याचाच अर्थ फक्त २५ % पाणी मिळणार आहे. त्यामुळे मनपाचे, पाटबंधारे विभागाला देय पाण्याचे बिल कमी होणार आहे. तसेच पाणी शुद्धीकरण खर्च, पंपिंगसाठीचा वीज खर्च यातही मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. दुसरीकडे नागरिकांना पुरेसे पाणी न मिळाल्याने त्यांना हजारो रुपये खर्च करावा लागतो आहे. या परिस्थितीत पाणीपट्टीत कपात करणे आवश्यक असताना त्यात दुपटीने वाढ करणे म्हणजे पाणीकपात सहन करणाऱ्या पुणेकरांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे, अशी भावना सजग नागरिक मंचच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.महापालिकेच्या फक्त ३८ हजार पाणी मीटर थकबाकीचा आकडा ४१७ कोटींवर जाऊन पोहोचला आहे. त्याशिवाय मिळकत करातील थकबाकीमधील पाणीपट्टीचा हिस्सा सुमारे १०० कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. ही सुमारे ५०० कोटी रुपयांची पाणीपट्टी थकबाकी वसूल करण्यात अपयश आलेल्या प्रशासनाने आपली अकार्यक्षमता झाकण्यासाठी प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांवर पाणीपट्टीचा बोजा वाढविण्याचा निर्णय घेणे चुकीचे असल्याचे सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर व विश्वास सहस्रबुद्धे यांनी स्पष्ट केले आहे.शहरातील हजारो मिळकतींना अद्याप कराची आकारणी होत नाही, मोठ्या संख्येने अनधिकृत होर्डिंग्ज, मोबाईल टॉवर उभे आहेत.त्या माध्यमातून पालिकेला कोट्यवधी रुपयांचा कर मिळणे शक्य आहे. विकासकामांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सर्वच राजकीय पक्ष आणि प्रशासन संगनमताने करीत आहेत. या उधळपट्टीला लगाम लावून ही करवाढ मागे घ्यावी, अशी मागणी हमारी अपनी पार्टीचे अध्यक्ष बाळासाहेब बिडकर यांच्या वतीने करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)