शिरूर : रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कारेगाव हद्दीतील ४२ कारखान्यांकडे ग्रामपंचायत कराची थकबाकी आहे. ग्रामपंचायतीने कारवाई’ची अंतिम नोटीसही दिली आहे. मात्र न्यायालयाचा आदेश असल्याने करवसुली करता येणार नाही, असे प्रशासनाने बजावल्याने त्यांचेही हात बांधले गेल्याची स्थिती आहे. याचा विपरीत परिणाम कारभार चालवताना जाणवत आहे.कारेगाव हद्दीत जवळपास १७५ कारखाने आहेत. या कारखान्यांकडून कारेगाव ग्रामपंचायतीला सुमारे ४ कोटी रुपयांचा कर मिळतो. या कारखान्यांपैकी ४२ कारखान्यांकडे ग्रामपंचायत कराची थकबाकी आहे. ही गेल्या वर्षाची थकबाकी आहे. ग्रामपंचायत करआकारणीसंदर्भात न्यायालयाच्या आदेशामुळे एप्रिलपासून ग्रामपंचायतींना करआकारणी करता येत नसल्याचे चित्र आहे. स्क्वेअर फूट की मालमत्ता मूल्यआधारावर कर आकारायचे याबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शासनस्तरावर काम सुरू आहे. यावर जो निर्णय होईल, त्यानुसार ग्रामपंचायतींना करआकारणी करावी लागणार आहे. २०१५-१६ या कर या नवीन निर्णयानुसारच कर आकारला जाणार आहे. मात्र कारखान्यांनी २०१४-१५ चा कर अद्याप भरला नसल्याचे सरपंच किसन नवले यांनी सांगितले.संबंधित थकबाकीदार कारखान्यांना अंतिम नोटीसही जारी करण्यात आली. त्यांना कर भरण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली होती. ही मुदतही संपली; मात्र कारखाने कर भरण्यास तयार नसल्याचे सरपंच नवले यांनी सांगितले. (वार्ताहर)ग्रामपंचायतीची आॅनरेकॉर्ड लोकसंख्या साडेपाच हजार आहे. मात्र, आज ती२५ हजारांवर आहे. त्यांनासुविधा पुरवाव्या लागतात. पाण्याचे बिलच दरमहा १० लाख रुपये आहे. अशा अवस्थेत खर्चाचा मेळ बसवताना ग्रामपंचायतीवर ताण येता.नवीन निर्णय आल्यावर या वर्षाचा कर त्यानुसार आकारला जाईल. मात्र, गेल्या वर्षाचा कर या कारखान्यांनी भरला पाहिजे, असे सरपंच नवले यांचे म्हणणे आहे. याबाबत त्यांनी जप्तीची तयारीही केली आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशनुसार करवसुली करता येणार नाही, असे नवले यांना सांगितल्याने त्यांनी जप्तीची कारवाई तूर्तास थांबविली आहे.थकबाकीमुळे ग्रामपंचायतीच्या खर्चाच्या मेळ बसत नसून कारभार चालवताना कसरत करावी लागत आहे. कारखान्यांचा कर न मिळाल्यास ग्रामपंचायत चालवणे अवघड हाईल- किसन नवले , सरपंच
४२ कारखान्यांकडे कराची थकबाकी
By admin | Updated: November 5, 2015 02:12 IST