शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

टाकवे बुद्रकमध्ये होणार ग्रामअभ्यासिका

By admin | Updated: January 11, 2017 02:50 IST

जिल्हा परिषदेने आपल्या शेवटच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण

पुणे : जिल्हा परिषदेने आपल्या शेवटच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रत्येक तालुक्यात एक अत्याधुनिक अशी ग्रामअभ्यासिका करण्यात येणार आहे. याला मंजुरी मिळाली असून यात प्राधान्याने स्पर्धा परीक्षच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रकचा त्यात समावेश आहे.खेडोपाड्यातील मुलं शिकली, मोठी झाली तर हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली असू शकते, म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून समाजमंदिरात प्रत्येक जिल्हा परिषद गटात एक अभ्यासिका करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती. मात्र, यात महत्त्वपूर्ण बदल करून आता प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे १३ ग्राम अभ्यासिका इमारतीसह अत्याधुनिक स्वरूपात करण्याचे ठरविले आहे. तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायती व शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाची केंद्र असलली गावे यासाठी निवडण्यात आली आहेत. एका अभ्यासिकेसाठी ३३ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असून यात सुसज्ज इमारत, ग्रंथालय, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी चांगली बैैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. १०० विद्यार्थ्यांची एका वेळेस व्यवस्था करण्यात येणार आहे. अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेला उपयुक्त असलेली सर्व पुस्तके ठेवण्यात येणार आहेत. तसेच इतर साहित्याची पुस्तकेही ठेवण्यात येणार आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मूलमंत्र दिला. हा मूलमंत्र डोळ्यांसमोर ठेवून जिल्हा परिषद प्रशासनाने शाहू, फुले व आंबेडकर यांच्या नावाने अभ्यासिका करण्याचा निर्णय घेतल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.थोर पुरुषांचे स्मरण फक्त जयंतीनिमित्तच न करता त्यांच्या विचारांची व कार्याची प्रेरणा कायम स्मरणात राहावी, सातत्याने त्यांचे विचार समाजात रुजावेत, यासाठी या अभ्यासिका काम करीत आहोत.- प्रदीप कंद, अध्यक्ष, जिल्हा परिषद