शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

मासिक पाळीवर जनजागृतीसाठी शिक्षण विभागाचा ‘टास्क फोर्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 12:22 IST

शिक्षण विभागाने मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी तीन स्तरावर ‘स्वच्छ विद्यालय स्वच्छ महाराष्ट्र टास्क फोर्स’ स्थापन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देयुनिसेफच्या सर्वेक्षणात ६० ते ७० टक्के किशोरवयीन मुली पाळीदरम्यान शाळेत जात नाहीत.पालिका आयुक्त, जिल्हा परिषदे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी हे टास्क फोर्सचे अध्यक्षया कार्यक्रमामध्ये पालकांनाही करून घेतले जाणार सहभागी

पुणे : शाळेतील किशोरवयीन मुलींची मासिक पाळीमुळे होणारी कुचंबणा टाळणे तसेच याविषयी समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी शिक्षण विभागाने मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी तीन स्तरावर ‘स्वच्छ विद्यालय स्वच्छ महाराष्ट्र टास्क फोर्स’ स्थापन करण्यात येणार आहे.देशात मासिक पाळी या विषयावर अनेक समज-गैरसमज असल्याने मासिक पाळी या विषयावर चर्चा करणेही टाळले जाते. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात युनिसेफच्या एका सर्वेक्षणात ६० ते ७० टक्के किशोरवयीन मुली पाळीच्या दरम्यान शाळेत जात नाहीत.  अशा परिस्थितीत मुलींना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ मिशनमध्ये याचाही समावेश करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने राज्यातील जालना, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, औरंगाबाद, अहमदनगर या जिल्ह्यांत युनिसेफच्या सहायाने मासिक पाळी व्यवस्थापन उपक्रम राबविला आहे.  

या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी महापालिका, जिल्हा, नगरपालिका स्तरावर स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन केला जाणार आहे. अनुक्रमे पालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्याधिकारी हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष असतील. या फोर्स मध्ये अन्य सहा सदस्य असतील. मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रमाची अंमलबजावणी, नियंत्रण, आढावा घेण्याची जबाबदारी या टास्क फोर्सवर असेल. मुलींना मासिक पाळी व्यवस्थापन कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्याबरोबर शाळांमध्ये आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत समन्वय साधण्याची जबाबदारी ही समिती करेल. या कार्यक्रमामध्ये पालकांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे.

टॅग्स :educationशैक्षणिक